नागपूर : कळमना न्यू ग्रेन मार्केटच्या समस्या तीन महिन्यात सोडविण्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार सेस कमी करण्याचे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी न्यू ग्रेन मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शनिवारी कळमना मार्केट यार्डात एका कार्यक्रमात केदार यांनी हजेरी लावून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी द होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि सचिव प्रताप मोटवानी यांनी केदार यांची भेट घेऊन न्यू ग्रेन मार्केटसंबंधित समस्यांचे निवेदन दिले. त्यांनी प्रशासकीय भवनात विविध समस्यांवर व्यापाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी कळमन्याचे माजी सभापती अहमद पटेल, धान्य बाजारचे अध्यक्ष अतुल सेनाड, गोपाल कळमकर, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अर्जुन वैरागडे, राजू उमाठे, रमेश उमाठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी उपस्थित होते.
केदार म्हणाले, कळमना न्यू ग्रेन मार्केटमध्ये दुकानांचे हस्तांतरण आणि वैध रजिस्ट्री लवकरच करण्यात येईल. दुकानांचे विजेचे बिल कमी करण्यावर भर राहील. बाजारात थंड पाण्यासाठी आरओ मशीन, सुलभ शौचालय आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांना टोकन पद्धतीने होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यात येईल.
कळमना बाजारात नवीन दुकाने तयार असून व्यापाऱ्यांना लवकरच वितरित करण्यात येणार आहे, शिवाय न्यू ग्रेन मार्केटचे गेट लवकरच सुरू करण्यात येईल. प्रतिनिधीमंडळात आशिष अग्रवाल रमेश उमाठे, शिव गुप्ता, राजेश मदरानी, राजू काशीकर, प्रवीण शाहू, विकी अग्रवाल, जयेश शाह, सुरेश अग्रवाल, अरुण अग्रवाल उपस्थित होते.