शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सेसच्या विरोधात नागपुरातील कळमना धान्य बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:39 IST

चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला नाही. समितीच्या कळमना मार्केट यार्डमधील न्यू ग्रेन मार्केटची दुकाने बंद होती.

ठळक मुद्देतीन कोटींचा व्यवसाय ठप्प : हमालांचा रोजगार हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला नाही. समितीच्या कळमना मार्केट यार्डमधील न्यू ग्रेन मार्केटची दुकाने बंद होती.होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि मॅसेज पाठवून कळमना मार्केट यार्डमधून सेस त्वरित हटविण्याची मागणी केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल और सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली. सेस रद्द न केल्यास व्यापारी तीव्र आंदोलन करतील, अशा इशारा यावेळी देण्यात आला.मोटवानी म्हणाले, व्यापार बंद आंदोलनादरम्यान बुधवारी कळमना धान्य बाजारात जवळपास सहा ते सात हजार पोते धान्याचा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे जवळपास तीन कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प राहिला. याशिवाय हमालांना रोजगार मिळाला नाही.अडतिया करणार बेमुदत आंदोलनकळमना धान्यगंज अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी अतुल सेनाड यांनी सांगितले की, धान्य व्यापाऱ्यांच्या व्यापार बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ कळमना अडतियांनी काम बंद ठेवले. केवळ धानाची बोली काढण्यात आली. यादरम्यान बैठक घेऊन पुढील काही दिवसात अडतिया असोसिएशनतर्फे सांकेतिक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेसच्या विरोधात अडतिया बेमुदत बंद करू शकतात.एनव्हीसीसीसह विविध संघटनांचे समर्थनकळमना मार्केटच्या धान्य व्यापाऱ्यांच्या व्यापार बंद आंदोलनाला नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी समर्थन दिले. ‘कॅमिट’चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात राज्यभर झालेल्या व्यापार बंद आंदोलनात कळमना मार्केटमधील नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया असोसिएशन, कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेयर असोसिएशनने समर्थन दिले.

टॅग्स :BaazaarबाजारStrikeसंप