शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

काल्याचाही होऊ शकतो ‘अक्कू’

By admin | Updated: December 3, 2014 00:35 IST

छेडखानी आणि विनयभंग करणारा कुख्यात राजेश खडसे ऊर्फ काल्या यालासुद्धा ‘अक्कू’जवळ पाठवण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाच-सहावेळा आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी

बांगलादेश वस्तीत दहशत : छेडखानीमुळे महिलांमध्ये आक्रोश नागपूर : छेडखानी आणि विनयभंग करणारा कुख्यात राजेश खडसे ऊर्फ काल्या यालासुद्धा ‘अक्कू’जवळ पाठवण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाच-सहावेळा आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या काल्याला आता एकही संधी न देण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. काल्याच्या दहशतीत जगणाऱ्या पाचपावली येथील चंद्रभागानगरातील महिला आणि तरुणी रात्र जागून काढीत आहेत. मेयो रुग्णालयात भरती असलेला काल्या केव्हा घरी परततो, याची त्या वाट पाहत आहेत. सूत्रानुसार काल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण, तोडफोड, चोरी, छेडखानीसह ३० पेक्षा अधिक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पाचपावली ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक तलावाला लागून बांगलादेश वस्ती आहे. याच वस्तीतील चंद्रभागानगरात काल्या राहतो. तो महिलांची व तरुणींची छेडखानी करण्यासाठी कुख्यात आहे. त्यामुळेच त्याची वस्तीत दहशत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने वस्तीत जुगाराचा क्लब चालवणाऱ्या मामाकडून हप्ता वसुली केली होती. जुगार अड्डा चालवणाऱ्या मामाने लोकांच्या मदतीने काल्याला चांगलाच चोप दिला होता. गंभीर जखमी झालेल्या काल्याला अद्दल घडवण्याचे वस्तीतील नागरिकांनीही निश्चित केले होते. परंतु काल्या नेहमीच शस्त्र घेऊन असतो. त्यामुळे त्याच्यासमोर जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही. संतापलेल्या महिला काल्याचा अक्कू करण्याची शक्यता लक्षात घेऊन पाचपावली पोलिसांनी काल्याला बांगलादेश वस्तीतून हाकलून दिले आहे. त्यानंतर तो कळमन्यातील पारडी येथे निघून गेला. तिथेसुद्धा तो हप्ता वसुली आणि मारहाण करू लागला. काही दिवसांपूर्वी काल्याचा पारडीतील सचिन वासनिकसोबत वाद झाला होता. तेव्हापासून सचिन त्याला संपविण्याच्या तयारीला लागला. सचिनला अद्दल घडवण्याच्या तयारीत असलेल्या काल्याने पारडीतील एका तरुणाला चाकूने वार करून जखमी केले. पोलिसांनी त्याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती. महिनाभरापूर्वीच काल्या जामिनावर सुटून आला होता. याची माहिती मिळताच जखमी तरुणाच्या परिचितांनी काल्याच्या घरावर हल्ला केला. काल्या हाती न लागल्याने त्याचे घर पेटवून दिले. पारडीत आपला खुन होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल्या १५ दिवसांपूर्वीच पारडी सोडून बांग्लादेश वस्तीत परत आला. तेव्हापासून वस्तीमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेश वस्तीतील एक कुटुंब कॅटरिंगच्या व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या आठवडाभरापासून काल्या या कुटुंबाला धमकावित आहे. तुरुंगातून सुटून येण्याचा खर्च ४० हजार रुपये झाल्याने तो खर्च या परिवाराला मागत आहे. २८ नोव्हेंबर रोजी त्याने कॅटरिंग व्यावसायिकेची मावशी व मुलीला मारहाण सुद्धा केली. मुलीला आपल्या सोबत बळजबरीने नेण्याचा प्रयत्नही केला. परंतु वस्तीतील लोकं धावले. त्यांनी काल्याला घेरले आणि लाठ्या काठ्यासह जे हातात येईल त्याने त्याची धुलाई केली. दरम्यान काल्याची पत्नी मदतीसाठी धावली. तिने आपल्या पतीला सोडण्याची विनंती केली. तिला पाहून महिलांचा राग शांत झाला. काल्याला सोडून महिला आपापल्या घरी निघून गेल्या. जखमी काल्यावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. (प्रतिनिधी)