शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:02 AM

केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा संदेश : अप्रतिम सादरीकरणाने कालिदास महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संत्रानगरी ही सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवाने विदर्भाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत असून, पर्यटनाचे केंद्र म्हणून अधिक मजबुतीने स्थापित होत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. सुधाकर कोहळे यांनी सांगितले, कवी कालिदास यांनी संस्कृतमधून अनेक अविस्मरणीय रचनांचा वारसा आपल्यासाठी ठेवला आहे. महोत्सवातील नृत्य व गायनाचे सादरीकरण म्हणजे या महान रचनाकाराला अभिवादन होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नंदा जिचकार व निशा सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कालिदास यांच्या वेगवेगळ्या रचनांवर आधारित संकल्पनांवर दरवर्षी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. 

त्यानंतर लेडी झाकीर हुसेन म्हणून प्रसिद्ध जगविख्यात तबलावादक अनुराधा पाल यांच्या तालवाद्य वृंदाचे अप्रतिम सादरीकरण झाले. अंतिम टप्प्यात मलमली स्वरांच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वरांची जादू रसिकांना अनुभवायला मिळाली. श्रवणानंदाचा आविष्कार अनुभवताना पहिल्याच दिवशी नागपूरकर श्रोते न्हाऊन निघाले.

माडखोलकर यांचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’  महोत्सवाची सुरुवात करण्याचा मान नागपूरच्या भरतनाट्यम् नृत्यांगना व गुरू श्रीमती माडखोलकर यांना मिळाला. कालिदासांच्या सर्वश्रेष्ठ अशा ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या महाकाव्यावर आधारित दृकश्राव्य आनंददायी शास्त्रीय नृत्य त्यांनी अप्रतिमपणे सादर केले.  कण्व ऋषींची सौंदर्यवती कन्या शकुंतला व राजा दुष्यंत यांच्या प्रथम भेटीतून निर्माण झालेले प्रेम, त्यांची आसक्ती. शकुंतलेच्या या आसक्तीमुळे ओढवलेला ऋषीचा रोष व त्यांच्या शापामुळे दैववश झालेली दोघांची ताटातूट व शापमुक्तीनंतर शकुंतला व राजा दुष्यंत यांचे आनंददायी पुनर्मिलन अशा पार्श्वभूमीचे हे महाकाव्य. खरंतर ४०० श्लोकांचे हे महाकाव्य सादरीकरणास तीन तासांच्यावर वेळ लागतो. मात्र त्यास लहान करून श्रीमती यांच्या कसदार सादरीकरणाने ते अतिशय प्रभावी ठरले. भरतनाट्यम्मध्ये भावमुद्रा व त्यानुसार पडणाऱ्या पदलालित्याचा संगम महत्त्वाचा असतो. भावमुद्रांमधून महाकाव्याचे कथानक अधोरेखित करण्याचे कसब त्या नृत्यांगनावर असते. श्रीमती यांनी ते सुंदरपणे सादर केली. कथानकातील शृंगार रसाची उत्कटता, तारुण्य सुलभ प्रीती, भावनांचे चित्रण, धीरोदात्त शकुंतलेचा स्वाभिमान, कणखरता अशा गुणांना श्रीमती यांनी त्यांच्या मुद्रांमधून चित्रित केले. डौलदार पदन्यास व त्यांच्यातील कसदार अभिनय क्षमतेमुळे त्यांचे सादरीकरण लक्षणीय ठरले. त्यांच्यासोबत गायक शिवप्रसाद, मृदंगम्वर के.एम. व्यंकटेश्वरम, व्हायोलिनवर शिरीष भालेराव व तालवाद्यावर बकुळ शावदे यांनी साथसंगत केली.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर