शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास महोत्सव : अनुराधा पाल, देवयानी, बेगम परवीन सुलताना यंदाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:52 IST

कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त संजीव कुमार यांची पत्रपरिषद: २७ पासून आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठीसांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१९९६ पासून सातत्याने कालिदास महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. या महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने तत्कालीन विभागीय आयुक्तांनी सन २०१५ मध्ये कालिदास समारोह समिती स्थापन करून कालिदास समारोह आयोजन समिती आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा महोत्सव केला. तेव्हापासून तो सलग सुरु आहे. गेल्यावर्षी ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर महोत्सव पार पडला. यावर्षीचा समारोह हा ‘शकुंतला: भारतीय स्त्रीचे सूर’ या विषयावर आधारित राहणार असून तबला क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पाल, विदुषी आरती अंकलीकर (गायिका) पद्मश्री देवयानी (भरतनाट्यम), कौशिकी चक्रवर्ती (गायिका), संगीता शंकर (व्हायोलीन) आणि बेगम परवीन सुलताना (गायन) या यंदाचे विशेष आकर्षण असतील, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात स्थानिक कलावंतांनाही संधी देण्यात आली असून माडखोलकर आणि त्यांचा ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या मंगलचरणाने या महोत्सवला सुरुवात होईल. यावेळी मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे, महसूल उपायुक्त, सुधाकर तेलंग, अतिरिक्त उपायुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.दुसरा टप्पा जानेवारीमध्येगेल्यावर्षी नागपूर व रामटेक येथे दोन टप्प्यात कालिदास महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाही तो दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल तर दुसरा टप्पा रामटेक येथे जानेवारीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कुवारा भिवसेन महोत्सव आणि कालिदास महोत्सव हा संयुक्तपणे घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर