शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

वंचित घटकांना न्याय मिळवून देणार ‘न्यायदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:28 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे.

ठळक मुद्दे‘एचसीबीए’ची योजना : पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वंचित घटकांना न्याय्य हक्कांविषयी मार्गदर्शन करणे व त्यांना न्याय मिळवून देणे याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये २१ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १० दुर्गम गावांमध्ये शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ही संघटना आतापर्यंत एका विशिष्ट चौकटीतच कार्य करीत होती. ती वकिलांच्या समस्यांबाहेर क्वचितच गेली असेल. या चौकटीला पहिल्यांदा तोडण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या व्यापक नेतृत्वाने वकिलांना समाजातील दुर्लक्षित घटकाच्या मदतीस धावून जाण्यासाठी प्रेरित केले आहे. हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जाणार आहे. दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चमू तयार करण्यात येणार असून प्रत्येक चमूत १० वकिलांचा समावेश राहणार आहे. या चमू एकाच वेळी १० गावांमध्ये शिबिरे आयोजित करतील. एका ठिकाणच्या शिबिरामध्ये आजूबाजूची सर्व गावे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परिणामी एकाचवेळी १५० ते २०० गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविता येतील. शिबिर २ ते ३ तास चालेल. या शिबिरामुळे नागरिकांच्या कुटुंब, जमीन, भरपाई इत्यादीशी संबंधित छोट्याछोट्या समस्या जागेवरच सुटतील. मोठ्या समस्या सोडविण्यासाठी कुठे जायचे, काय करायचे, कुणाला भेटायचे याचे योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण कमी होईल व पक्षकारांची आर्थिक बचत होईल असा संघटनेला विश्वास आहे. या उपक्रमात स्थानिक वकील व विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. उपक्रमावर देणग्यांतून मिळणारी रक्कम खर्च केली जाणार आहे.योजनेत या बाबींचा समावेश१ - सामाजिक व आर्थिक मागास, अपंग, अशिक्षित, वृद्ध, निराधार आदी व्यक्तींना न्याय मिळवून देणे.२ - शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष यांना न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे. अत्याचार दूर करण्यासाठी त्यांना मदत करणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.३ - महिला अत्याचार व बाल मजुरी या समस्यांवर मार्गदर्शन करून ही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे.४ - समाजाला शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवून देणे.५ - समस्या सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे.शनिवारी या गावात शिबिरेयेत्या शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली, साखरा, जेप्रा, गिलगाव, ब्राह्मणी, खुर्सा, मेंढा (बोधली), चुरचुरा, अमिर्झा व टेंभा या गावांतील प्राथमिक शाळांमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिरे आयोजित करण्यात येतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांच्या हस्ते अडपल्ली येथे सकाळी १०.३० वाजता उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.कार्यशाळेत मोठ्या संख्येत उपस्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील बार रुममध्ये गुरुवारी न्यायदूत उपक्रमावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत वकील मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांना उपक्रमाचा उद्देश, संवाद कौशल्य, कार्यपद्धती, शिबिरे आयोजन इत्यादीबाबत सखोल माहिती देण्यात आली. या उपक्रमाविषयी प्रत्येकजण उत्साही असल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल