शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्या. नितीन सांबरे यांचा कुलगुरू सुभाष चाैधरी यांची याचिका ऐकण्यास नकार

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 21, 2024 17:49 IST

आता दुसऱ्या न्यायपीठासमक्ष होईल सुनावणी : सोमवारची तारीख मिळाली

राकेश घानोडे, नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रमुख न्यायपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी शुक्रवारी काही वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी यांच्या याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. त्याकरिता त्यांना सोमवारची तारीख मिळाली आहे.

चौधरी यांनी त्यांना निलंबनाच्या कारवाईसाठी बजावण्यात आलेल्या नवीन कारणे दाखवा नोटीसच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यांच्यावर विविध प्रकारची अनियमितता केल्याचा आरोप आहे. यापूर्वी कुलपती रमेश बैस यांनी चौधरी यांना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी निलंबित केले होते. चौधरी यांनी त्याविरुद्धही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १४ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने बैस यांचा तो वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला होता. चौधरी यांना निलंबित करताना कुलगुरू सेवाशर्ती कायद्यातील बंधनकारक तरतुदींचे काटेकोर पालनच केले गेले नाही, असा निष्कर्ष त्या निर्णयात नोंदविण्यात आला होता. या कायद्यानुसार कुलगुरुंविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कुलपतींनी निर्देश देणे आवश्यक आहे.

परंतु, चौधरी यांच्या प्रकरणात राज्य सरकारने चौकशी करून घेतली होती. यावेळी बैस यांनी ती चूक सुधारली. त्यांनी स्वत: उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करून घेतली. तसेच, मांडे यांच्या अहवालाची दखल घेऊन चौधरी यांना निलंबन कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि येत्या सोमवारी सुनावणीकरिता हजर होण्याचे निर्देश दिले. त्यावर चौधरी यांचा आक्षेप आहे. ही नोटीस अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चाैधरी यांच्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Mumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ