शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

न्या. लोया यांचा मृत्यू रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:32 IST

सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला, असा खळबळजनक दावा अ‍ॅड. सतीश उके यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देअ‍ॅड. सतीश उके यांचा दावा : हायकोर्टात दाखल केली नवीन याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला, असा खळबळजनक दावा अ‍ॅड. सतीश उके यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.२०९ पानांच्या या याचिकेमध्ये उके यांनी त्यांच्या स्वत:च्या जीवाला दोषी व्यक्तींकडून धोका असल्याचा आरोप केला आहे. संशयास्पद मृत्यू झालेले अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर व सत्र न्यायाधीश प्रकाश ठोंबरे यांनी उके यांना लोया यांचा मृत्यू रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाल्याची माहिती दिली होती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.मार्च-२०१५ मध्ये भाजपाच्या एका बड्या नेत्याने अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशनच्या तत्कालीन अध्यक्षाची भेट घेतली होती. त्या बैठकीचा सर्व रेकॉर्ड नष्ट करण्यात आला आहे. लोया यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला होता, असे संकेत यातून मिळत आहेत. त्या काळात लोया यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोललो होतो. दरम्यान, त्यांनी सोहराबुद्दीन प्रकरणामुळे धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. लोया यांनी सोहराबुद्दीन प्रकरणातील मसुदा निर्णयाची खंडाळकर यांना माहिती दिली होती. त्यानंतर खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. तसेच, ठोंबरे यांचा मे-२०१६ मध्ये नागपूर ते बंगळुरू रेल्वे प्रवासादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. ८ जून २०१६ रोजी लोखंडाचे पाईप व अन्य जड वस्तू आपल्या कार्यालयावर फेकण्यात आल्या होत्या. त्यातून आपण सुदैवाने बचावलो, असे उके यांनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयाने स्वत:च्या ताब्यात सुरक्षित ठेवून घ्यावीत, अशी विनंती उके यांनी याचिकेत केली आहे.

टॅग्स :justice loyaन्यायाधीश लोयाHigh Courtउच्च न्यायालय