शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बस ‘हायजॅक’ दाम्पत्य निर्दोष

By admin | Updated: September 13, 2015 02:39 IST

बसचालकासह सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने संशयाचा लाभ मिळून बहुचर्चित बस ‘हायजॅक’ प्रकरणातील आरोपी दाम्पत्याची सहायक ...

न्यायालय : सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले फितूरनागपूर : बसचालकासह सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने संशयाचा लाभ मिळून बहुचर्चित बस ‘हायजॅक’ प्रकरणातील आरोपी दाम्पत्याची सहायक सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सतीश फत्तेसिंग अडमाची (३३) आणि संगीता सतीश अडमाची (२३) रा. बुटीबोरी, असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. सरकार पक्षानुसार खटल्याची पार्श्वभूमी अशी, इम्रानखान मोबीनखान हा इंडोरामा कंपनीच्या कामगारांची ने-आण करण्यासाठी एमएच-४०-एन-८८४ क्रमांकाची हंसा ट्रॅव्हल्सची बस झाशी राणी चौक (सोया मिल्क कंपनी नाला) ते बुटीबोरी, अशी चालवीत होता. २० आॅगस्ट २००९ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हंसा ट्रॅव्हल्सचाच एक चालक राजा याने बस थांबवून तो बसमध्ये बसला होता. पुन्हा बस पुढील प्रवासासाठी सुरू झाली असता अचानक सतीश अडमाची हा जबरदस्तीने बसमध्ये शिरला होता. त्याने चाकू काढून प्रवाशांना दाखवीत बस हायजॅक केल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने बसचालकाला बसमधील दिवे बंद करण्यास सांगून बस झाशी राणी चौकाकडे वळवण्यास फर्मावले होते. बस पंचशील चौकातून वळण घेऊन गर्ल्स हायस्कूलसमोर आली असता सतीशची पत्नी संगीता ही बसमध्ये शिरली होती. या दोघांनीही बस हायजॅक केली होती. दरम्यान प्रवाशांपैकीच कोणी तरी मोबाईलने ही माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांना बस अडवण्यास यश मिळाले होते. प्रवाशांसह ही बस धंतोली पोलीस ठाण्यात नेण्यात आली होती. चालक इम्रानखान याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३९२, ३६४-ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अडमाची दाम्पत्यास अटक केली होती. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात प्रत्यक्ष साक्षीपुराव्याच्या वेळी फिर्यादीसह सरकार पक्षाच्या कोणत्याही साक्षीदाराने सरकार पक्षाला मदत केली नाही. सरकार पक्षाने घेतलेल्या उलट तपासणीतही त्यांनी हायजॅकची घटना घडल्याचा इन्कार केला. सरकार पक्षाने जप्त चाकू न्यायालयात सादर केला नव्हता. शस्त्र कायद्याबाबतच्या अधिसूचनेची प्रतही प्रकरणासोबत जोडली नव्हती. या सर्व बाबींचा आरोपींना लाभ मिळून न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ए. एम. नायर तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. ए. टी. सुखदेवे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)