शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
2
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
3
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
4
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
5
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
6
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
7
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
8
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
9
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
10
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
11
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
12
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
13
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
14
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
15
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
16
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
17
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
18
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
19
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

चौकीदाराच्या खुनात मजुरास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 03:07 IST

चोरीची वाच्यता केल्याने चौकीदारावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी मजुराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या

काटोल भागातील थरार : चोरीची वाच्यता केल्याने घातले होते कुऱ्हाडीने घावनागपूर : चोरीची वाच्यता केल्याने चौकीदारावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी मजुराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विनोद वासुदेव बालपांडे (३५), असे आरोपीचे नाव असून तो नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा येथील रहिवासी आहे. शंकर नारायणराव कोकाटे (४५), असे मृत चौकीदाराचे नाव होते. तो नरखेड तालुक्यातीलच मदना येथील रहिवासी होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, लिंगा (पारडी) येथील रहिवासी प्रशांत पुंडलिकराव भोयर यांनी आपल्या शेतावर बायो डिझेल फिल्टर प्लॅन्टचे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाचे कंत्राट त्यांनी काटोल येथील मनोज बन्सीलाल अहुजा यांना दिले होते. या बांधकामावर विनोद बालपांडे, प्रकाश चिंचोरिया, श्रावण घाटोड आणि इतर हे मजूर होते. याच बांधकामाच्या ठिकाणी शंकर कोकाटे हा चौकीदार होता. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रशांत भोयर यांनी नागपूर येथून छताचे २८ चॅनल आणि ४ अँगल आणून ते बांधकामाच्या ठिकाणी ठेवले होते. १७ फेब्रुवारीच्या सायंकाळी विनोद बालपांडे याने २ अँगल आणि १ चॅनलची चोरी केली होती. १९ फेब्रुवारी रोजी नागपूरहून फॅब्रिकेशनचे काम करणारे कामगार आले होते. अँगल आणि चॅनलला पेंटिंग करीत असताना त्यांना दोन अँगल आणि एक चॅनल कमी असल्याचे आढळून येताच त्यांनी मालक प्रशांत भोयर यांना सांगितले होते. भोयर यांनी बांधकाम कंत्राटदार अहुजा यांच्याकडे विचारणा केली होती. अहुजा यांनी या चोरीबाबत चौकीदाराकडे विचारणा केली असता त्याने विनोद बालपांडे याचे नाव सांगितले होते. अहुजा यांनी बालपांडे याला विचारणा केली असता आधी त्याने टाळाटाळ केली होती. नंतर त्याने चोरीची कबुली देऊन अँगल आणि चॅनल काढून देतो, असे म्हटले होते. तो अहुजा आणि इतर मजुरांना सोबत घेऊन जात असता अर्ध्या रस्त्यातून बेपत्ता झाला होता. १९ फेब्रुवारीच्या रात्री केव्हा तरी त्याने घटनास्थळ गाठून चौकीदार शंकर कोकाटे याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून केला होता. २० फेब्रुवारीच्या सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास चौकीदाराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. खून केल्यानंतर बालपांडे हा पळून गेला होता. त्याला २० फेब्रुवारी रोजीच पोलिसांनी वरुड तालुक्याच्या आमनेर येथे अटक केली होती. (प्रतिनिधी)परिस्थितीजन्य पुराव्यांची जुळली साखळीया प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी केला होता. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यांनी आरोपीविरुद्ध मजबूत परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात ते आरोपपत्रासह सादर केले. सरकार पक्षाने या परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तंतोतंत जोडली. न्यायालयात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील माधुरी मोटघरे, आरोपीच्यावतीने अ‍ॅड. नितीन वासे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण महल्ले आणि रमेश नवले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.