शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

जंगल सफारी खासगी वाहनाने

By admin | Updated: June 19, 2017 02:25 IST

उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धी मिळत असली, तरी नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या बोर अभयारण्यात

बोर अभयारण्यात सोईसुविधांचा अभाव : पर्यटकांना आनंदाऐवजी मनस्ताप योगेंद्र शंभरकर । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धी मिळत असली, तरी नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या बोर अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्याची घटना पुढे आली आहे. यामुळे हजारो रुपये खर्च करून जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना मौज आणि आनंदाऐवजी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या अभयारण्यातील प्रवेशासाठी मागील सहा महिन्यापूर्वी अडेगाव येथे नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. परंतु येथे पर्यटकांसाठी अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. पर्यटकांच्या मते, येथील जंगल सफारीसाठी आॅनलाईन बुकिंग करताना जिप्सी उपलब्ध असल्याचा पर्याय दाखविला जातो. त्यानुसार अनेकजण जिप्सीची निवड करतात. शिवाय त्यानुसार पर्यटक गेटवर जिप्सी उपलब्ध होणार, असे गृहित धरू न तेथे पोहोचतात. परंतु तेथे गेल्यानंतर कोणतीही जिप्सी मिळत नाही, कारण वन विभागाने अजूनपर्यंत तशी कोणतीही सोय उपलब्ध केलेली नाही. एवढेच नव्हे, तर या गेटवर पर्यटकांना साधे पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नाही. मग महिलांसाठी शौचालय आणि इतर सोईसुविधांचा विचार न केलेलाच बरा. यामुळे विशेषत: महिलांना फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. महिला पर्यटक नीलिमा महात्मे यांच्या मते, अडेगाव गेटवरील वन विभागाच्या कार्यालयात एक शौचालय आहे. परंतु ते कार्यालय सुरू झाल्यानंतर उघडल्या जाते. तसेच शहरातील देशपांडे परिवार आपल्या खासगी वाहनाने अडेगाव गेटवर जंगल सफारीसाठी पोहोचला होता. त्यांना गेटवर जंगल सफारीसाठी जिप्सी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना कोणतीही जिप्सी मिळाली नाही. शिवाय त्यांनी प्रवेश शुल्क भरल्यानंतर त्यांच्यासोबत एक महिला गाईड देण्यात आली. मात्र जंगलातील रस्त्यांवरू न छोटी खासगी कार चालविणे फारच कठीण झाले होते. कारच्या चालकाला फार मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे त्यांना जंगल सफारीचा आनंद मिळण्याऐवजी समस्यांचाच अधिक सामना करावा लागला.