शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग पद्धतीवर रंगली जुगलबंदी

By admin | Updated: May 26, 2016 03:02 IST

महापालिका निवडणुकीत सध्या अस्तित्वात असलेल्या एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धती ...

परिसंवाद : एक सदस्यीय की बहुसदस्यीय पद्धतीवर मांडली भूमिकानागपूर : महापालिका निवडणुकीत सध्या अस्तित्वात असलेल्या एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु एक सदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती हिताची आहे यावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यावर व्यापक चर्चा व्हावी. या हेतूने ‘प्रयास’ फाऊंडेशनतर्फे मोरभवन येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यात प्रभाग पद्धतीवरून वक्त्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. व्यासपीठावर प्रयासचे अध्यक्ष अनिल अहिरकर व सचिव शेखर आदमने उपस्थित होते. भाजप समर्थित वक्त्यांनी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, मनसे व विदर्भवादी संघटनांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला जोरदार विरोध दर्शवून हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याची भूमिका मांडली. महापालिकेतील सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, रुपा रॉय यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती जनतेच्या हिताची असून विकासाला चालना देणारी असल्याची भूमिका मांडली. काँग्रेसच्या कार्यकाळातच प्रभाग पद्धत आणली होती. त्यामुळे भाजपने ही पद्धत आणली नसल्याचे तिवारी यांनी निदर्शनास आणले.मनसेचे प्रशांत पवार, काँग्रेसचे नगसेवक प्रफुल्ल गुडधे, विदर्भ कनेक्टचे अधयक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे,माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, नगरसेवक दीपक पटेल, बसपाचे नगरसेवक मुरलीधर मेश्राम आदींनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध दर्शविला. राजकीय स्वार्थासाठी भाजप बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आणण्याचा विचारात आहे. यामुळे अपक्ष व लहान पक्षांना फटका बसेल. ही पद्धती लोकशाही विरोधी असून विकासाला बाधा ठरणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन महेश तिवारी यांनी केले. (प्रतिनिधी)