शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जोशी, जयस्वाल यांना मिळाले महामंडळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांची महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी तर शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांची महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.या दोन्ही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त आहे. संदीप जोशी यांनी सलग दोनदा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी वेळोवेळी त्यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, ऐनवेळी हुलकावणी मिळाली. अधिवेशन काळात झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या वेळी तर त्यांचे नाव निश्चित मानले जात होते. पण संधी हुकली. शेवटी लघु उद्योग विकास महामंडळासारखे महत्त्वाचे महामंडळ देऊन समाधान करण्यात आले आहे. नियुक्तीनंतर लोकमतशी बोलताना संदीप जोशी म्हणाले, आपण २० वर्षांपासून भाजपाचे काम करीत आहोत. महापालिकेत विविध जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविण्यात आल्या. त्या आपण पार पाडल्या. आता ही एक नवी जबाबदारी सोपविली आहे. तिचेही चीज होईल असे त्यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीत पराभवानंतरही आशिष जैस्वाल हे शिवसेनेचा किल्ला ताकदीने लढवित राहिले. पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांनाही खनिकर्म महामंडळ सोपविण्यात आले.लघुउद्योगासाठी शासनाच्या योजना, त्यात येणाऱ्या अडचणी याचा अभ्यास करून रोडमॅप तयार केला जाईल. या क्षेत्रात बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी आपला प्रयत्न करील. संदीप जोशीअध्यक्ष, लघु उद्योगविकास महामंडळ‘‘पक्षाकडे काहीच मागितले नसतानाही संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत जनतेसाठी काम करू. चांगले काम करून राज्याला व विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करू’’. आशिष जैस्वालअध्यक्ष, खनिकर्मविकास महामंडळ

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीAshish Jaiswalआशीष जयस्वाल