शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जेएमएफसी : भूविकासकाला सहा महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:32 IST

कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.

ठळक मुद्देधनादेश अनादराचे प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.होशियारसिंग असे तक्रारकर्त्याचे नाव असून, ते गार्डस् रेजिमेंटल सेंटरमध्ये कार्यरत आहेत. होशियारसिंग यांनी यादव यांच्या मौजा घोरपड येथील ले-आऊटमधील एक भूखंड ७ लाख ५० हजार रुपयात खरेदी केला होता. त्या भूखंडाचे सहा महिन्यात विक्रीपत्र करण्याचे ठरले होते. होशियारसिंग यांनी यादव यांना धनादेशाद्वारे ७ लाख ५० हजार रुपये दिले. दरम्यान, यादव हे निर्धारित वेळेत भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ शकले नाही. परिणामी, त्यांनी संबंधित रक्कम व्याजासह परत करण्यासाठी होशियारसिंग यांना सुरुवातीला ६ लाख ५० हजार रुपयाचे दोन धनादेश दिले. ते धनादेश बँक खात्यात कमी रक्कम असल्यामुळे १९ फेब्रुवारी व १२ सप्टेंबर २०१७ रोजी अनादरित झाले. त्यानंतर होशियारसिंग यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यादव यांच्याविरुद्ध जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. होशियारसिंग यांच्यातर्फे अ‍ॅड. एच. आय. कोठारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर