शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला पीसीआर न देण्याचा जेएमएफसीचा आदेश रद्दबातल

By admin | Updated: July 19, 2015 03:10 IST

सत्र न्यायालयाचा आदेश : एक कोटीच्या फसवणुकीचे प्रकरण

नागपूर : बनावट दस्तऐवजावर जमीन आणि सहा भूखंड विकून एक कोटी सहा लाख रुपयांनी फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकरणात तपास अधिकाऱ्याने मागणी करूनही आरोपीला पोलीस कोठडी रिमांड न देण्याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने रद्दबातल ठरवला. आरोपीच्या संदर्भातील पोलीस कोठडी रिमांडच्या नवीन अर्जावर योग्य दृष्टिकोनातून विचार करण्याचे निर्देशही सत्र न्यायालयाने दिल्याने राणा प्रतापनगर पोलिसांनी सय्यद अर्शद ख्वाजा नावाच्या आरोपीला १६ जुलै रोजी कारागृहातून आपल्या ताब्यात घेऊन त्याला पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांकडून आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. या न्यायालयाने आरोपीला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गंभीर स्वरूपाच्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी ३ जुलै २०१५ रोजी क्लार्क टाऊन चैतन्य अपार्टमेंट येथील रहिवासी सय्यद अर्शद ख्वाजा आणि त्याची पत्नी फैजा सय्यद ख्वाजा यांना अटक केली होती. आरोपींनी स्वत:च्या मालकी हक्काचे बनावट दस्तऐवज तयार करून प्रतापनगर खसरा १२७/२ आणि ३ मधील जमीन तसेच परसोडी येथील खसरा ३३/१, २ आणि ३४/१ मधील सहा भूखंड सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी रमेश पिसे यांना विकून त्यांची एक कोटी सहा लाख रुपयांनी फसवणूक केली. झालेल्या सौद्यानंतर नॅशनल फायर कॉलेजमार्फत पिसे यांनी घेतलेल्या जमिनीवर कम्पाऊंड वॉल उभारली जात असताना केलेल्या चौकशीनंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. पिसे यांनी दाखल केलेल्या केलेल्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी २ जुलै २०१५ रोजी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ३ जुलै २०१५ रोजी दोन्ही आरोपींना अटक करून त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले होते. तपास अधिकाऱ्याने योग्य तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. न्यायालयाने बचाव आणि सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून पोलीस कोठडी रिमांडची मागणी नामंजूर केली होती. लागलीच आरोपींच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केला होता. अर्जावर न्यायालयाने सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्याचे उत्तर मागविले होते. ४ जुलै रोजी सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्याने उत्तर दाखल केले होते. न्यायालयाने फैजाला जामीन मंजूर करून सय्यद अर्शद ख्वाजा याला जामीन नाकारला होता. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) च्या आदेशाला तपास अधिकाऱ्याने सत्र न्यायालयात आव्हान देणारा पुनर्विचार अर्ज दाखल केला. बनावट आणि खोट्या दस्तऐवजाच्या आधारावर आरोपींनी हेतूपुरस्सर केलेला हा अपराध आहे. आरोपींनी १ कोटी ६ लाख रुपये हडपून निष्पाप फिर्यादीचे मोठे नुकसान केले आहे. गंभीर स्वरूपाचा हा अपराध असल्याने तपासाची नितांत गरज आहे. दस्तावेज जप्त करणे आहे. त्यामुळे जेएमएफसीचा आदेश रद्द करून सखोल तपासासाठी दोन्ही आरोपींच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची परवानगी दिली जावी, असेही अर्जात नमूद करण्यात आले होते. न्यायालयाने सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचे म्हणणे ऐकले. तसेच जेएमएफसीच्या आदेश पत्राचेही अवलोकन केले. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात तपास आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढून न्यायालयाने जेएमएफसीचा आदेश रद्दबातल ठरवला. (प्रतिनिधी)