शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

‘जीम कार्बेट’ शिकारी नव्हे, संशोधक!

By admin | Updated: October 6, 2014 00:56 IST

‘जीम कार्बेट’ एक शिकारी होते, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते एक शिकारी नव्हे, तर निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संशोधकही होते, असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशमुख यांनी केले.

व्याख्यान : अर्चना देशमुख यांचे प्रतिपादन नागपूर : ‘जीम कार्बेट’ एक शिकारी होते, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते एक शिकारी नव्हे, तर निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संशोधकही होते, असे प्रतिपादन डॉ. अर्चना देशमुख यांनी केले. वन्यजीव सप्ताहानिमित्त सृष्टी पर्यावरण संस्था, मैत्री परिवार व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘जीम कार्बेट’ यांच्यावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अतिरिक्त महानिरीक्षक रविकिरण गोवेकर होते. अतिथी म्हणून सृष्टी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बेहरे व मैत्री परिवारचे अरविंद गिरी उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अर्चना देशमुख यांनी ‘जीम कॉर्बेट’ यांच्यावर संशोधन करून आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांना हे संशोधन करताना ‘जीम कार्बेट’ यांच्याविषयी गोळा केलेल्या माहितीचा यावेळी उलगडा करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, ‘जीम कार्बेट’ यांच्याविषयी विचार करताना, एखादा शिकारी वाघाच्या संवर्धनाबद्दल सकारात्मक कसा असू शकतो, असा प्रश्नसहज डोक्यात उभा राहतो. ‘जीम कार्बेट’ यांनी १२ वाघांच्या शिकारी केल्याची नोंद आहे. मात्र ते सर्व वाघ नरभक्षी होते, त्यांनी एकूण १५०० लोकांना मारले होते, हे येथे लक्ष्यात घेतले पाहिजे. यावरून ते हौशी शिकारी होते, असे म्हणता येणार नाही. त्यांना वन्यप्राणी व निसर्गाविषयी जीवापाड प्रेम होते. तेवढेच त्यांना सूक्ष्म ज्ञानही होते. त्यांचे संपूर्ण बालपण नैनितालमधील निसर्गाच्या सानिध्यात गेले. त्यामुळे त्यांना निसर्ग व वन्यप्राण्यांविषयी फारच सखोल ज्ञान होते. ते अवघ्या दहा वर्षांचे असताना, वन्यप्राणी व निसर्गाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तीन-तीन दिवस जंगलात राहत होते. त्यामुळे त्यांना वन्यप्राण्यांची भाषा कळत होती. वन्यप्राण्यांचा आवाज, त्यांचा अधिवास, सवयी व हालचालींविषयी सखोल ज्ञान होते. त्यावेळी सरकारने वन्यप्राणी व निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी अनेक अवॉर्ड जाहीर केले. परंतु त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही. त्याकाळी मौज व प्रतिष्ठा म्हणून वाघाची शिकार केली जात होती. परंतु ‘जीम कार्बेट’ यांनी हौशीपोटी कधीही वाघाला मारले नाही. हे लक्ष्यात घेतले पाहिजे. त्यांनी वन्यप्राणी व निसर्गावर नेहमीच प्रेम केले असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. संचालन स्वानंद सोनी यांनी केले. माधुरी यावलकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)