शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे दागिन्यांचे कारागीर बेरोजगार : नागपुरात २० हजारांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:32 IST

लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

ठळक मुद्देअसोसिएशनकडून मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सराफांसह सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिरांसाठी मार्च, एप्रिल आणि मे ही तीन महिने सुगीचे असतात. तीन महिन्यातील कमाईच्या रकमेची वर्षभरासाठी जुळवाजुळव करून ठेवतात. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी कारागिरांचे आधार कार्ड घेऊन आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत.नागपूर सराफांसाठी मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ असून गलाई, गठाई, डाय कटिंग करणाऱ्यांसह सोन्याचे दागिने तयार करणारे जवळपास २० हजार नागपुरात कारागीर आहेत. यातील बहुतांश कारागीर मूळचे पश्चिम बंगालचे तर गलाई आणि गठाई करणारे कोल्हापूर व सोलापूरचे आहेत. सर्व कारागीर विखुरले असून नागपुरात राहूनच कुटुंबाचे पालनपोषण करतात. तीन महिन्यांच्या सीझनसाठी कारागिरांचे जानेवारीपासूनच काम सुरू होते. पण लॉकडाऊननंतर त्यांच्यावर संकट कोसळले आहे. काम बंद झाले आहे.सर्व कारागिरांचे काम कंत्राटीवर असते. हाताला कामच नसल्याने त्यांना मदत करण्यास कुणीही तयार नाही. काही भागात जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात त्यांना मदत मिळत आहे. पण किती दिवस मिळणार, हा गंभीर प्रश्न आहे. कामच नसल्याने पुढे काय करायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे. हाती रोख रक्कम नसल्याने औषध उपचार आणि आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य नाही. ही स्थिती किती दिवस राहणार, याची कुणालाही माहिती नाही. त्यामुळे कारागिर चिंतेत असून ते संघटित नसल्याने सरकारकडून मदतही मिळणार नाही. सराफा असोसिएशनने मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.नुकसानीचा आकडा सांगणे कठीणचलग्नाच्या सीझनसाठी सराफा व्यापारी सज्ज असतानाच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सराफांचे सर्व व्यवहार बंद आहेत. यंदाच्या सीझनमध्ये किती कोटींचे नुकसान होईल, याची आकडेवारी सांगणे कठीण आहे. पण लॉकडाऊनमुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. नागपूर जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा जास्त छोट्या सराफा व्यावसायिकांवरही संकट आले आहे. त्यातील अनेकजण कारागीर आहेत. लग्नसराई नसल्याने दागिन्यांचे ऑर्डरच बंद आहेत.विशेष दागिना निर्मितीत नागपूरची खासीयतचपलाकंठी, बांगड्या, अष्टपैलू पाटल्या, बदामी अंगठ्या, नथ, कंठी मंगळसूत्र, डोरले आदींच्या निर्मितीत नागपुरातील कारागिरांची खासीयत आहे. जेवढे काम करेल, तेवढीच कारागिरी त्यांना मिळते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण सीझनच थांबल्याने कुणाकडेही काम नाही. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनची मदतलॉकडाऊनमुळे सोन्याचे दागिने तयार करणारे कारागीर संकटात आहेत. त्यांना देशस्तरावरील संघटना जेम्स आणि ज्वेलरीतर्फे मदत करण्यात येत आहे. कारागिरांचे आधार कार्ड घेऊन मुंबई कार्यालयाला पाठवून त्यांच्या खात्यात रोख रक्कम टाकण्यात येत आहे. जास्तीत जास्त कारागिरांना आवश्यक मदत करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. नागपुरात प्रदीप कोठारी आणि राजेश रोकडे असोसिएशनचे सदस्य आहेत.- पुरुषोत्तम कावळे, संचालक, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर