शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर विमान २.१७ तास उशिरा पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:18 IST

जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या भूमिकेचा प्रवाशांनी निषेध करीत कंपनीच्या विमानसेवेवर रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देवैमानिकांचा उड्डाणास नकार : प्रवाशांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या भूमिकेचा प्रवाशांनी निषेध करीत कंपनीच्या विमानसेवेवर रोष व्यक्त केला.जेट एअरवेजचे हे विमान निर्धारित वेळेनुसार नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी २.३५ वाजता उड्डाण भरते आणि नागपुरात सायंकाळी ४.२० वाजता पोहोचते. पण वैमानिकांनी उड्डाण भरण्यास नकार दिल्यामुळे विमान उशिरा उडाले आणि नागपुरात सायंकाळी ६.३७ वाजता अर्थात २.१७ मिनिटे उशिरा पोहोचले. नवी दिल्लीत विमानाच्या उड्डाणास उशीर होत असल्याचे कळताच प्रवाशांनी विमानात गोंधळ घातला. कंपनीने प्रवाशांना समजविण्यासाठी नाश्ताचे कुपन देऊन कॅन्टिनमध्ये पाठविले. त्या दरम्यान स्थिती पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांना सायंकाळी ४.५० वाजता विमानात बसविण्यात आले. विमान नागपुरात आल्यानंतर प्रवासी शांत होते. दिल्लीत दिवसभर दृश्यता कमी असल्यामुळे सर्वच विमानांच्या उड्डाणांना काही मिनिटे उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरJet Airwaysजेट एअरवेज