शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:28 IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली.

ठळक मुद्देनागपूर मनपाची पोलीस बंदोबस्तात मनपाची कारवाई : ८६४०.२८ चौरस फुटात होते अवैध बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने या कारवाईला सुरुवात झाली.आंबेकर याने नेहा संतोष आंबेकर यांचा ६०.१८ चौरस मीटर, अमरचंद मगनलाल मेहता यांचा ७२१.५६ चौरस मीटर व संतोष आंबेकर याच्या स्वत:च्या नावावर असलेला २१.३० चौरस मीटर असे तीन प्लॉट एकत्र करून ८०३ चौरस मीटर जागेवर (८६४०.२८ चौ.फूट) महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता अलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केले होते.महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी १२ च्या सुमारास कारवाईला सुरूवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला. तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे. यावेळी मनपाच्या प्रवर्तन विभागाचे सहायक आयुकत अशोक पाटील, लकडगंज झोनच पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्यासह महापालिका व पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण