शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव कारागृहातून जयेशचे पाकमध्ये फोन, संघावरील नाराजीतून गडकरींना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 12:06 IST

जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. फोन कॉल ट्रेस होऊ नये यासाठी तो विशिष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग करायचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीतून त्याने गडकरींना धमकीचा फोन लावला होता.

कर्नाटकातील तुरुंगात जयेशचा पीएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचा सचिव मोहम्मद अफसर पाशा याने ब्रेनवॉश केले होते. पाशा तुरुंगात असताना त्याच्याकडे मोबाइल असायचा आणि त्या मोबाइलमध्ये त्याच्याकडे विशेष सॉफ्टवेअर होते. तेच सॉफ्टवेअर जयेशने काही काळ वापरले होते. त्याने भारतातील विविध ठिकाणी फोन केले होते. शिवाय पाकिस्तान, अमेरिका, सुदान, नायजेरिया आणि पोलंडमध्येही  संपर्क साधल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्याने नेमका कुणाला संपर्क केला होता हे एनआयएच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.

...म्हणून काढला  गडकरींवर राग

  • पीएफआयवर बंदी येऊ शकते, तर संघावर बंदी का नको हा विचार जयेशच्या मनात घोळत होता. 
  • गडकरी संघाच्या जवळचे असल्याने त्याने त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असलेला राग व्यक्त करण्यासाठी जयेशने गडकरी यांना धमक्या दिल्याचे तपासात समाेर आले आहे.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ