शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग

By योगेश पांडे | Updated: May 27, 2023 18:00 IST

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते.

योगेश पांडे नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. फोन कॉल ट्रेस होऊ नये यासाठी तो विशिष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग करायचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीतून त्याने गडकरींना धमकीचा फोन लावला होता.कर्नाटकातील तुरुंगात जयेशचा पीएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारी।परिषदेचा सचिव मोहम्मद अफसर पाशा याने ब्रेनवॉश केला होता. पाशा तुरुंगात असताना त्याच्याकडे मोबाईल असायचा आणि त्या मोबाईलमध्ये त्याच्याकडे विशेष सॉफ्टवेअर होते. तेच सॉफ्टवेअर जयेशने काही काळ वापरले होते. त्याने भारतातील विविध ठिकाणी फोन केले होते. शिवाय पाकिस्तान, अमेरिका, सुदान, नायजेरिया आणि पोलंडमध्येही  संपर्क साधल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्याने नेमका कुणाला संपर्क केला होता हे एनआयएच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.

म्हणून दिली गडकरींना धमकीपीएफआय वर बंदी येऊ शकते, तर संघावर बंदी का नको हा विचार जयेशच्या मनात घोळत होता. गडकरी संघाच्या जवळचे असल्याने त्याने त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी