शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

... जय बोलो हनुमान की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:24 IST

राम लक्ष्मण संग जानकी, जय बोलो हनुमान की..., एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... अशा पवनपुत्राचे गुणगान करणाऱ्या भजनांच्या गजरात राजाबाक्षाच्या हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण भारताचे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या आराधनेत लहान थोर उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले ५० च्या वर आकर्षक चित्ररथ बघण्यासाठी रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देनागपूरच्या  राजाबाक्षा मंदिरातून निघाली शोभायात्रा : ५० च्यावर चित्ररथांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राम लक्ष्मण संग जानकी, जय बोलो हनुमान की..., एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... अशा पवनपुत्राचे गुणगान करणाऱ्या भजनांच्या गजरात राजाबाक्षाच्या हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण भारताचे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या आराधनेत लहान थोर उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले ५० च्या वर आकर्षक चित्ररथ बघण्यासाठी रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती.हनुमानजीची आरती व पूजा झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. मयूर रथावर हनुमानजीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. आमदार सुधाकर कोहळे, इस्कॉनचे स्वामी अद्वैत प्रभू, नगरसेवक विजय चुटेले, छोटू भोयर, संयोजक विवेक तिवारी यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेत आकर्षक चित्ररथाबरोबरच हनुमानाच्या वेशभूषेत बालगोपाल सहभागी झाले होते. शोभायात्रा रामबाग होत कॅपिटल हाईटस्, अजंता चौक, उंटखाना, चंदननगर, मेडिकल चौक, हनुमाननगर, क्रीड़ा चौक, स्मृतिमंदिर रेशीमबाग, तिरंगा चौक, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर, नंदनवन बसस्टॉप, गुरुदेवनगर, सक्करदरा चौक, रघुजीनगर, छोटा ताजबाग, अयोध्यानगर, दत्तात्रेयनगर, शारदा चौक, जवाहरनगर, ताजनगर, मानेवाडा रोड, चंद्रमणीनगर, अजनी रेल्वे कॉलनी होत परत राजाबाक्षा मंदिरात पोहोचली.शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी श्रद्धाळूंनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. यातून सामाजिक संदेशही देण्यात आला होता. जागोजागी पुष्पवर्षाव करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. चित्ररथांमध्ये अयोध्या येथील राममंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्याचबरोबर रामायणातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते. यावेळी मिहिर मेहता, अभिषेक तिवारी, राधेश्याम राजपूत, हर्षल कुंडे, प्रशांत नागुलवार, विजय पुरोहित, वैष्णवी तिवारी, गीता वाघेला, कांता शर्मा, टिना वैद्य, माया बेन, लता शर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rajabaksha Mandirराजाबाक्षा मंदिरMedical square Nagpurमेडिकल चौक, नागपूर