शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जावई-मेव्हण्याने लावला १०० काेटीला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

जगदीश जोशी नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनऊ येथील रहिवासी जावई ...

जगदीश जोशी

नागपूर : अगरबत्ती उद्याेगात गुंतवणूक करून दाेन महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून लखनऊ येथील रहिवासी जावई व मेव्हण्याच्या जाेडीने देशभरात लाेकांची १०० काेटींची फसवणूक केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. पाॅश हाॅटेल्समध्ये सेमीनार आयाेजित करून या जाेडीने लाेकांना चुना लावला.

या फसवणुकीचा सूत्रधार गिरीशचंद्र गुप्ता व त्याचा मेव्हणा राजेशकुमार गुप्ता हाेय. दाेघांनी जीबीएस कंपनी सुरू करून अनिल सिबे संचालक, अजगर अलीला कंपनीचा प्रमाेटर व नागपूरचे राज शर्मा व प्रेम पुरके यांना एजंट म्हणून नियुक्त केले. ठगांनी शिताफीने अली, शर्मा व पुरके यांना समाेर केले. त्यांनी २०१९ मध्ये नागपूरच्या गुंतवणूकदारांशी संपर्क केला. त्यांना चर्चेसाठी मुंबईच्या पाॅश हाॅटेलमध्ये बाेलावले. विमानाची तिकिटेही काढून दिली. त्यानुसार वर्धेच्या सुनील जायसवाल यांच्यासह चार लाेक २६ मार्च राेजी मुंबईला गेले. अलीने जीजा व मेव्हण्याच्या कंपनीला १० वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. त्यांचा अगरबत्ती निर्मितीचा माेठा कारभार असून १०,५०० रुपये गुंतवणूक केल्यास २०,००० चा माल देण्यात येणार असल्याचे सांगितले. विक्री करण्याची इच्छा नसल्यास स्वत: कंपनी ते विकून १५,००० रुपये परत करेल, असे आमिष दाखविले.

मुंबईमध्ये अलीने जायसवाल व साेबत्यांना नागपूरच्या एका महिलेशी ओळख करून दिली. त्या महिलेस ७० हजार रुपयांचा चेक देण्यात आला. कंपनीने दाेन महिन्यांत दीडपट दिल्याचे त्या महिलेने सांगितले. जायसवालसह इतर १०-१२ लाेकांनी कंपनीमध्ये प्रत्येकी एक ते दाेन लाखांची गुंतवणूक केली. त्यांना दाेन महिन्यांतच दीडपट रक्कम परत करण्यात आली. पुन्हा पैसा देण्याऐवजी गुंतवणूक करण्याचे आवाहन जावई-मेव्हण्याने केले. चार महिने नफा दिल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. मग पैसा परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. दरम्यान, २२ मार्च २०२० राेजी जनता कर्फ्यू व २४ मार्चला लाॅकडाऊन लावण्यात आला. लाॅकडाऊन लागताच गुप्ता जाेडीने कंपनीची वेबसाईट बंद करून टाकली आणि दाेघेही पसार झाले. गिरीश गुप्ताने स्वत:च्या मृत्यूचा खाेटा व्हिडीओ बनविला. जाेडीला शाेधण्यासाठी पीडित लखनऊपर्यंत गेले. तेथे त्यांचे चार बंगले असल्याची बाब समजली. गुंतवणूकदार तेथे पाेहोचताच दाेघांनी पळ काढला. या जाेडीने अलाहाबादमधल्या वकिलांचे ६.५० काेटी लंपास केले. याशिवाय लखनऊ, कानपूर, मंबईसह अनेक शहरांत फसवणुकीचे सत्र चालवून अनेकांना लुटले.

नागपुरातून लुटले २० काेटी

आर्थिक गुन्हे शाखेने ६ जुलै राेजी ३.३३ काेटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला; मात्र नागपूर व आसपासच्या शहरातून २० काेटींहून अधिकची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे. त्यातील २५० लाेकांची नावे समाेर आली असून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पीडितांची स्थिती अतिशय वाईट

ठग जाेडीच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. काहींनी तर त्यांचे नातेवाईक व मित्रांनाही गुंतवणूक करायला भाग पाडले. आता ते मित्र व नातेवाईक पैशासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्यासारखी स्थिती आल्याचे सांगितले आहे. पीडितांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यावर पाेलीस कारवाईसाठी तत्पर झाले.