शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! तीन किलोमीटर लांबीची रेल्वेगाडी; नाव ठेवले ‘शेषनाग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 09:22 IST

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेत पहिल्यांदाच धावली एवढी मोठी गाडीचार रेल्वेगाड्यांना जोडले‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव दाखल करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार मालगाड्यांना जोडून एक रेल्वेगाडी यशस्वीरीत्या तयार केली. जवळपास ३ किलोमीटर लांबीच्या या मालगाडीला ‘शेषनाग’ नाव देण्यात आले. या गाडीत २३६ वॅगन, चार ब्रेक व्हॅन आणि ९ विद्युत लोको शेडचा समावेश आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग या घटनेला ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे.नागपूर विभागाच्या परमालकसा रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही रिकामी रेल्वेगाडी कोरबासाठी रवाना झाली. या गाडीने परमालकसा ते दुर्गपर्यंत २२ किमीचे ४५ मिनिटांचे अंतर पार केले. त्यानंतर ही गाडी बिलासपूर आणि कोरबासाठी रवाना झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी याबाबत विभागातील अधिकारी अधिक उत्साही असल्याचे सांगितले. यामुळे अधिक माल वाहतुकीसोबत वेळेवर धान्य किंवा इतर साहित्य पोहोचविण्यासाठी हे मोठे पाऊल असून आतापर्यंत देशात असा प्रयत्न करण्यात आला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मालगाड्यांचा वेग वाढलारेल्वेगाड्यांच्या गतीबाबत रेल्वेत स्पीडगनच्या माध्यमातून आकस्मिक तपासणी करण्यात येत आहे. विभागीय परिचालन शाखेच्या तंत्रानुसार मालगाड्यांच्या वेगात वाढ झाली आहे. आधी मालगाड्या ५० किलोमीटर प्रतितास धावत होत्या. आता मालगाड्यांचा वेग ८० किलोमीटर प्रतितास वाढला आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे