शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके : कुत्रे पकडण्यासाठी मागितली २५०० रुपयांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:57 IST

सार्वजनिक जागेवर बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन ऐवजदार कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देनागपूर मनपाचे दोन ऐवजदार कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक जागेवर बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाच्या दोन ऐवजदार कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले.एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार विलास श्रीरामजी चरडे आणि सुरेश कृष्णराव डांगे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चरडे मनपाच्या आरोग्य विभागात ऐवजदार आहे तर डांगे मनपाच्या मेकॅनिकल विभागात ऐवजदार वाहन चालक आहे. तक्रारकर्ता टिमकी, दादरा पूल येथील रहिवासी आहे. तक्रारकर्त्याने प्रभाग क्रमांक ८, टिमकी दादरा पूल जवळील मोकळ्या जागेवर बसणाºया कुत्र्यांना पकडण्यासाठी गांधीबाग झोन कार्यालयात अर्ज केला होता. १३ नोव्हेंबर रोजी तक्रारकर्ता याबाबत विचारणा करण्यासाठी चरडे आणि डांगे यांना भेटले. दरम्यान चरडे आणि डांगेने तकारकर्त्यास कुत्रे पकडण्यासाठी २५०० रुपये लाच मागितली. तक्रारकर्त्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने दोघांना रंगेहात पकडण्याची योजना आखली.बुधवारी ठरलेल्या योजनेनुसार तक्रारकर्त्याने चरडे व डांगेकडे जाऊन २५०० रुपयाऐवजी १५०० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. दोघेही तयार झाले. बोलणे झाल्यानंतर तक्रारकर्त्याने चरडे व डांगेला १५०० रुपये दिले. रक्कम स्वीकारताच दडून असलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली. सोबतच त्यांच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.ही कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील व अवर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस हवालदार वकील शेख, रविकांत डहाट आणि रेखा यादव यांनी केली.

 

 

टॅग्स :dogकुत्राAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग