शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

विदर्भातून जान्हवी राठी, श्रेयस गाडगे ‘टॉप’

By admin | Updated: May 29, 2016 02:48 IST

‘सीबीएसई’ (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) च्या दहावीचे निकाल शनिवारी जाहीर झाले.

‘सीबीएसई’ दहावीचा निकाल जाहीर : विद्यार्थिनींचाच वरचष्मानागपूर : ‘सीबीएसई’ (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) च्या दहावीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात विदर्भातून यवतमाळ येथील यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी जान्हवी राठी व नागपुरातील नारायणा विद्यालयमचा श्रेयस गाडगे या दोघांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघांनाही प्रत्येकी ९९.६ टक्के (४९८) गुण मिळाले. विदर्भातील ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत हे विशेष.‘सीबीएसई’तर्फे १ मार्च ते २६ मार्च २०१६ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. शनिवारी सकाळी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. विदर्भातून ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे १५ हजार विद्यार्थी बसले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ‘सीजीपीएम’नुसार (क्युमूलेटिव्ह ग्रेड पॉईन्ट अ‍ॅव्हरेज) निकाल पाहायला मिळाला. त्यानंतर काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे पूर्ण गुण आले व त्यानंतर चित्र स्पष्ट झाले. जान्हवी व श्रेयसपाठोपाठ नागपूरच्या सेंटर पॉर्इंट शाळेची विद्यार्थिनी अमिषा केळकर, नारायणा विद्यालयाचा हितेश कांडला व झेव्हियर्स स्कूल, हिंगणा रोड येथील विद्यार्थी शुभंकर बॅनर्जी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तिघांनाही प्रत्येकी ९९.४ टक्के (४९७) गुण आहेत. विदर्भातून प्रथम आलेले जान्हवी, श्रेयस आणि अमिषा, हितेश व शुभंकर यांच्या गुणांमध्ये केवळ एकच गुणाचा फरक आहे, हे येथे उल्लेखनीय. तिसऱ्या क्रमांकावर नारायणा विद्यालयाचेच शिवम चौबे व तृषा साखरकर हे दोघे आहेत. त्यांना ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त झाले.यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी जान्हवी राठी हिला ९९.६० टक्के गुणांसह चार विषयांत १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. विदर्भातून जान्हवी, श्रेयस ‘टॉप’यवतमाळसारख्या जिल्ह्यातून विदर्भात अव्वल आलेल्या जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जान्हवी राठी हिने संस्कृत, एसएसटी, विज्ञान, गणित या चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले असून इंग्रजीत तिला ९८ गुण मिळाले आहेत. जान्हवीचे वडील जयप्रकाश राठी हे कापड व्यापारी असून आई भारती ही गृहिणी आहे. तिची लहान बहीण पलक सहाव्या वर्गात शिकते आहे. जान्हवीच्या यशाचे कौतुक जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, यवतमाळ पब्लिक स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. जेकब दास, समन्वयक अर्चना कढाव, रुकसाना बॉम्बेवाला यांनी केले आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच या स्कूलचे सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के, चैतन्य चावक आणि आदित्य अंबाडकर यांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहेत.अमरावतीमधील स्कूल आॅफ स्कॉलर्सची आदिती बिहाडे व भक्ती देशपांडे या दोन विद्यार्थिनींनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवून संयुक्तरीत्या पहिला क्रमांक पटकाविला आहे. याच शाळेच्या प्रज्ञील धर्माधिकारी व तनवीर पुंड यांनी प्रत्येकी ९५.६ टक्के गुण प्राप्त करून दुसरे स्थान पटकाविले आहे. तर याच शाळेची साक्षी रायचंदानी हिने ९५.२ टक्के गुण मिळवून तिसरे स्थान पटकाविले. स्कूल आॅफ स्कॉलर्स, महर्षी स्कूल, पीआर पोटे स्कूल, अभ्यासा स्कूल, विश्वभारती स्कूल आदींचा १०० टक्के निकाल लागला आहे.वर्धा जिल्ह्यातील शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, १४९ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० गुणांकन प्राप्त केले आहे. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्यानिकेतन येथील सोमनाथ मुखर्जी याने ९९ टक्के तर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील तनया वानखेडे हिने ९८.२ टक्के गुण घेतल्याची माहिती दिली. यानुसार ते हे दोघे जिल्ह्यातून प्रथम आणि द्वितीय ठरत आहेत. नऊ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्व सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला. महर्षी विद्यामंदिरातील साक्षी देऊलवार ही ९८.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. नारायणा विद्यालय चंद्रपूर, महर्षी विद्यालय चंद्रपूर, माऊंट कारमेल स्कूल चंद्रपूर, कारमेल अकॅडमी, चांदा पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, बियाणी विद्यामंदिर, माऊंट हायस्कूल, केंद्रीय विद्यालय दुर्गापूर, माऊंट फोर्ट ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर आदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली होती.गोंदिया जिल्ह्यात केवळ गोंदिया शहरातील पाचही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यापैकी साकेत पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राहुल बजाज याने ९८.८० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. दहावी सीबीएसई परीक्षेला गोंदिया पब्लिक स्कूलमधून सर्वाधिक ५४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. त्यापाठोपाठ सेंट झेव्हियर्स स्कूलमधील २६, साकेत पब्लिक स्कूलमधील १९ तर प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील १८ तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सलोनी मेश्राम हिने पटकाविला. तिला ९७.०२ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट, स्कूल आॅफ स्कॉलर गडचिरोली व कारमेल हायस्कूल गडचिरोली या तिन्ही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.भंडारा जिल्ह्याचा निकाल ९५.९२ टक्के लागला आहे. महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्यार्थी केतन प्रशांत वैद्य हा जिल्ह्यातून प्रथम आला आहे. त्याला ९८.८० टक्के गुण मिळाले. याच विद्यालयाची हर्षदा शेषराव आंबीलढुके ही जिल्ह्यातून द्वितीय आली. तिला ९८.६ टक्के गुण मिळले आहेत. जिल्ह्यातील १० शाळांमधून एकूण ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)चौकटजान्हवी म्हणते, डॉक्टर व्हायचेय!सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत विदर्भात अव्वल ठरलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या जान्हवी राठी हिला डॉक्टर व्हायचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात जाऊन ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करायची आहे. ‘लोकमत’ने जान्हवीशी संपर्क साधून तिचे कौतुक केले. त्यावेळी ती म्हणाली, मला यशाची खात्रीच होती. त्या दृष्टीनेच मी सुरुवातीपासून नियमित अभ्यास केला. त्यामुळेच हे यश मिळाले. वर्गात शिकविलेले पुन्हा एकदा घरी जाऊन त्याची रिव्हीजन हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे ती सांगते. वाचन, बॅडमिंटनची आवड असलेली जान्हवी म्हणते, आई-वडील आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हे उत्तुंग यश मिळाले आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या एन्जॉय करण्यासाठी जान्हवी नागपूर येथे आजोबाकडे गेली आहे. गुणवंतांची पसंती वैद्यकीय-अभियांत्रिकी शाखेलाचउपराजधानीतून पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जणांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेलाच पसंती दिली आहे. गेल्या वर्षी गुणवंतांनी अभियांत्रिकीला जास्त प्राधान्य दिले होते. यवतमाळसारख्या जिल्ह्यातून विदर्भात अव्वल आलेल्या जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जान्हवी राठी हिने संस्कृत, एसएसटी, विज्ञान, गणित या चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले असून इंग्रजीत तिला ९८ गुण मिळाले आहेत. जान्हवीचे वडील जयप्रकाश राठी हे कापड व्यापारी असून आई भारती ही गृहिणी आहे. तिची लहान बहीण पलक सहाव्या वर्गात शिकते आहे. जान्हवीच्या यशाचे कौतुक जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, यवतमाळ पब्लिक स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. जेकब दास, समन्वयक अर्चना कढाव, रुकसाना बॉम्बेवाला यांनी केले आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच या स्कूलचे सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के, चैतन्य चावक आणि आदित्य अंबाडकर यांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहेत.अमरावतीमधील स्कूल आॅफ स्कॉलर्सची आदिती बिहाडे व भक्ती देशपांडे या दोन विद्यार्थिनींनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवून संयुक्तरीत्या पहिला क्रमांक पटकाविला आहे. याच शाळेच्या प्रज्ञील धर्माधिकारी व तनवीर पुंड यांनी प्रत्येकी ९५.६ टक्के गुण प्राप्त करून दुसरे स्थान पटकाविले आहे. तर याच शाळेची साक्षी रायचंदानी हिने ९५.२ टक्के गुण मिळवून तिसरे स्थान पटकाविले. स्कूल आॅफ स्कॉलर्स, महर्षी स्कूल, पीआर पोटे स्कूल, अभ्यासा स्कूल, विश्वभारती स्कूल आदींचा १०० टक्के निकाल लागला आहे.वर्धा जिल्ह्यातील शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, १४९ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० गुणांकन प्राप्त केले आहे. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्यानिकेतन येथील सोमनाथ मुखर्जी याने ९९ टक्के तर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील तनया वानखेडे हिने ९८.२ टक्के गुण घेतल्याची माहिती दिली. यानुसार ते हे दोघे जिल्ह्यातून प्रथम आणि द्वितीय ठरत आहेत. नऊ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्व सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला. महर्षी विद्यामंदिरातील साक्षी देऊलवार ही ९८.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. नारायणा विद्यालय चंद्रपूर, महर्षी विद्यालय चंद्रपूर, माऊंट कारमेल स्कूल चंद्रपूर, कारमेल अकॅडमी, चांदा पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, बियाणी विद्यामंदिर, माऊंट हायस्कूल, केंद्रीय विद्यालय दुर्गापूर, माऊंट फोर्ट ज्युनिअर कॉलेज बल्लारपूर आदी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली होती.गोंदिया जिल्ह्यात केवळ गोंदिया शहरातील पाचही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यापैकी साकेत पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राहुल बजाज याने ९८.८० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. दहावी सीबीएसई परीक्षेला गोंदिया पब्लिक स्कूलमधून सर्वाधिक ५४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. त्यापाठोपाठ सेंट झेव्हियर्स स्कूलमधील २६, साकेत पब्लिक स्कूलमधील १९ तर प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील १८ तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सलोनी मेश्राम हिने पटकाविला. तिला ९७.०२ टक्के गुण मिळाले आहेत. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट, स्कूल आॅफ स्कॉलर गडचिरोली व कारमेल हायस्कूल गडचिरोली या तिन्ही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. भंडारा जिल्ह्याचा निकाल ९५.९२ टक्के लागला आहे. महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्यार्थी केतन प्रशांत वैद्य हा जिल्ह्यातून प्रथम आला आहे. त्याला ९८.८० टक्के गुण मिळाले. याच विद्यालयाची हर्षदा शेषराव आंबीलढुके ही जिल्ह्यातून द्वितीय आली. तिला ९८.६ टक्के गुण मिळले आहेत. जिल्ह्यातील १० शाळांमधून एकूण ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)