शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
3
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
4
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
5
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
6
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
7
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
8
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
9
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
10
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
11
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
12
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
13
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
14
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
15
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
16
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
17
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
18
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
19
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
20
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

जनता कर्फ्यू : व्यापारी प्रतिष्ठाने बंद, रस्त्यावर नागरिकांची गर्दी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 20:41 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी फार्मसी, डेअरी आणि काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता नागपुरातील सर्वच बाजारपेठांमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.

ठळक मुद्दे इतवारी, मस्कासाथ, महाल, गांधीबाग, सराफा ओळ, सीताबर्डी बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी फार्मसी, डेअरी आणि काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता नागपुरातील सर्वच बाजारपेठांमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली नाही. याशिवाय शनिवार २६ आणि रविवारी २७ सप्टेंबरलाही जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

नागपुरातील सर्व बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले आहे. व्यापारी आणि नागरिकांनी चेंबरच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, हे विशेष.मेहाडिया म्हणाले, नागपुरात कोरोना संसर्गासोबत रुग्णांचीही संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सप्टेंबर महिन्यात दोन शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यूमध्ये जनतेने स्वत:च्या रक्षणासाठी नियम आणि अटींचे पालन करायचे आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे. याशिवाय बाजारात गर्दी होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने दोन दिवस बंद ठेवावीत. व्यापारी निरोगी राहिल्यास पुढेही त्यांना कमविता येईल. याशिवाय स्वत:चे कुटुंब आणि कर्मचाºयांची काळजी घेण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. सध्या बाजारात नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जनता कर्फ्यू हाच एकमेव उपाय आहे. त्याचे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पालन करावे.होलसेल किराणा इतवारी, मस्कासाथ बाजारपेठा बंदइतवारी होलसेल किराणा मार्केट असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, असोसिएशनच्या निर्णयानुसार जनता कर्फ्यूमध्ये इतवारी आणि किराणा बाजारपेठा शनिवारी बंद होत्या. याशिवाय २६ आणि २७ सप्टेंबरलासुद्धा बाजारपेठा बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे व्यापारी भयभीत आहेत. नियमित दिवसात व्यापारी सायंकाळी ७ च्या आत दुकाने बंद करीत आहेत. दुकानात कर्मचाºयांचीही संख्या कमी आहे. व्यापाºयांनी ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.इतवारी सराफा बाजार बंदनागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे व सचिव राजेश रोकडे म्हणाले, असोसिएशनच्या निर्णयानुसार इतवारी मुख्य सराफा बाजार आणि नागपुरातील सराफांची दुकाने बंद आहेत. कोरोनावर मात करण्याचा व्यापाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे. जीव वाचला तर पुढेही व्यवसाय करू, असा व्यापाऱ्यांचा मूलमंत्र आहे. जनता कर्फ्यू व्यापारी आणि नागरिकांच्या हितासाठीच आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे.होलसेल धान्य बाजार बंदहोलसेल धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, कळमना आणि इतवारी येथील होलसेल धान्य बाजार जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय २६ आणि २७ सप्टेंबरला आयोजित जनता कर्फ्यूमध्येही बंद राहणार आहे. याशिवाय आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय कळमना होलसेल न्यू ग्रेन मार्केटने घेतला आहे.गांधीबाग होलसेल क्लॉथ व यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान म्हणाले, गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केट २० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. असोसिएशनचे जनता कर्फ्यूला समर्थन आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर