शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बील थकबाकीमुळे जल जीवन मिशन अडचणीत

By गणेश हुड | Updated: May 25, 2024 18:03 IST

जिल्ह्यात १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण : वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या  जिल्हा परिषदेच्या १३०२ पैकी ४३० योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांची कामांची सुरु आहेत. तर काही गावांतील कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. पाणीपुरवठा योजनांची जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी असल्याने जल जीवन मिशनच्या ३०० हून अधिक योजना अडचणीत सापडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली असताना योजना पूर्ण होवूनही वीज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचार्इचा सामना करावा लागत आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी जलजीवन मिशनच्या योजनांची माहिती  दिली होती. पूर्वीची महावितरणची लाखो रुपयांची देयके ग्रामपंचायतींवर थकीत आहेत. यामध्ये पथदिव्यांपेक्षा पाणीपुरवठा योजनेची रक्कम अधिक आहे. काही ग्रामपंचायतींनी ही देयके विहित मुदतीत टप्पानिहाय भरली होती. तर काही ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका 'जलजीवन' मधील नवीन ३०० च्या जवळपास योजनांना बसला आहे.  योजनांचा वीजपुरवठ्याची प्रक्रिया पूर्वीच्या थकीत देयकांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. या योजनांच्या वीजपुरवठ्यावर तत्काळ मार्ग न निघाल्यास पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गतकाळातील थकबाकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जिल्ह्यात १३०२ योजनांचे नियोजन 

'जलजीवन मिशन' या महत्त्वाकांक्षी योजनेतून १३०२ कामांचे नियोजन करण्यात आले. डिसेंबर २०२४ पर्यंत या योजनेतील संपूर्ण कामे पूर्ण करायची आहेत. ४३० कामे पूर्ण झाली आहेत. ८६० पैकी काही योजना प्रगतिपथावर तर काही योजनांची कामे रखडली आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ५७१ कोटी रुपयांची कामांना मंजुरी आहे.

टॅग्स :electricityवीज