शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तिघांची हत्या करणाऱ्या बिरहाची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण, हायकोर्टात अहवाल सादर

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 17, 2023 17:56 IST

गैरवर्तन, बेशिस्तीची तक्रार नाही

नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांची शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण हत्या करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याची तुरुंगातील वागणूक सर्वसाधारण आहे. त्याच्याविरुद्ध गैरवर्तन व बेशिस्तीची कोणतीही तक्रार नाही, अशी माहिती नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

उच्च न्यायालयाला बिरहाच्या शिक्षेवर निर्णय जाहीर करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने गेल्या ११ ऑक्टोबर रोजी बिरहाची कारागृहातील वागणूक कशी आहे, त्याच्याविरुद्ध काही तक्रारी आहेत का इत्यादी माहिती मागितली होती. त्यानुसार, संबंधित अहवाल सादर करण्यात आला. सत्र न्यायालयाने बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले आहे. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले आहे.

या प्रकरणावर गेल्या जुलैमध्ये न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. बिरहा १७ नोव्हेंबर २०१५ पासून कारागृहात आहे. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.

२०१५ मधील घटना

समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपीने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय