जय शिवराय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 10:40 AM2020-02-20T10:40:16+5:302020-02-20T10:41:09+5:30

राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव बुधवारी नागपुरात महाल, गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.

Jai Shivarai ... | जय शिवराय...

जय शिवराय...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सव बुधवारी महाल, गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. अनेकजण ऐतिहासिक आणि पारंपरिक वेशभूषेत होते. अनेक चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. या निमित्ताने स्टेजवर सकाळपासूनच चित्तथरारक पारंपरिक कवायती, नृत्य, नाटक, योगासने, लेझिम आणि विविध कार्र्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ढोलताशाच्या निनादात लोकांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. नागपुरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सकाळपासूनच शिवाजी पुतळ्याजवळ लोकांनी एकत्र होण्यास सुरुवात झाली. लहानांपासून मोठ्यापर्यंत बहुतांश पारंपरिक वेशभूषेत होते. शिवाजी महाराजांची वेशभूषा आणि हातात तलवार असलेल्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधले. बॅण्ड पथकाने कार्यक्रमात रंगत आणली. बॅण्ड पथकावर ताल धरत असताना सर्वांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. समाजातर्फे सकाळी ८ वाजता महिला आणि युवकांनी स्कूटर रॅली आणि सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा काढली. रॅली आणि शोभायात्रेचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष राजे मुधोजी भोसले आणि राजा शिव छत्रपती प्रतिष्ठानतर्फे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे आणि महापौर संदीप जोशी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस, सेवादल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांचा जयजयकार केला.
सायंकाळपर्यंत अनेक संघटनांनी भेट दिली. शिवजयंती महोत्सव सायंकाळपर्यंत साजरा करण्यात आला.

Web Title: Jai Shivarai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.