शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जय जय सदगुरू गजानना! रक्षक तूची भक्तांना!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:45 IST

संत श्री गजानन महाराजांचा १४१ वा प्रकटदिनोत्सव सोमवारी उपराजधानीत मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ठिकठिकाणच्या गजानन मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी होती. कुठे डोळ्याचे पारणे फेडणारी ‘श्रीं’ची पालखी व मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा तर कुठे भजनांच्या स्वरांचा गजर. घरोघरी अंगणात आणि पालखीच्या मार्गावरही सडा घालून काढलेल्या रांगोळ्या. प्रकटदिनाच्या शुभेच्छांनी आनंदमय झालेले वस्त्यांचे वातावरण व भक्तीचा प्रवाह ओसंडून वाहत होता. संत श्री गजानन महाराज की जय’ गजराने गजानन भक्तांच्या रोमारोमात उत्साह होता. पारायण व टाळ मृदंगाचे स्वर आणि ‘गण गण गणात बोते’च्या मंत्राने संपूर्ण उपराजधानी मंतरली होती.

ठळक मुद्देनागपूरकरांनी अनुभवला पालखी-मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत श्री गजानन महाराजांचा १४१ वा प्रकटदिनोत्सव सोमवारी उपराजधानीत मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ठिकठिकाणच्या गजानन मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी होती. कुठे डोळ्याचे पारणे फेडणारी ‘श्रीं’ची पालखी व मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा तर कुठे भजनांच्या स्वरांचा गजर. घरोघरी अंगणात आणि पालखीच्या मार्गावरही सडा घालून काढलेल्या रांगोळ्या. प्रकटदिनाच्या शुभेच्छांनी आनंदमय झालेले वस्त्यांचे वातावरण व भक्तीचा प्रवाह ओसंडून वाहत होता. संत श्री गजानन महाराज की जय’ गजराने गजानन भक्तांच्या रोमारोमात उत्साह होता. पारायण व टाळ मृदंगाचे स्वर आणि ‘गण गण गणात बोते’च्या मंत्राने संपूर्ण उपराजधानी मंतरली होती.गजानन मंदिर : त्रिमूर्तीनगरत्रिमूर्तीनगरातील श्री सदगुरु गजानन महाराज सेवाभावी मंडळातर्फे प्रगट दिन महोत्सवानिमित्ताने सोमवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यात नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील ७०० पेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. दरम्यान गजानन महाराजांच्या जयघोषात हजारो भाविक सहभागी झाले होते. २६ फेब्रुवारीला महाप्रसाद आहे. प्रगट दिन महोत्सवाची सुरुवात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता गणेश पूजन, मंडप स्थापनेने झाली. त्यानंतर अभिषेक, हरिपाठ, १९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी ४ वाजता संत श्यामनारायण दास महाराज (श्री अयोध्या) यांचे भागवत, रात्री ८ वाजता भजन झाले. त्यात भेंडे ले-आऊट येथील नानोटी परिवारातर्फे भक्ती संगीत, त्यानंतर दररोज कृष्णाई महिला भजन मंडळ पन्नासे ले-आऊट, प्रतापनगरातील स्वरदा भजन मंडळ तर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सामूहिक पारायण, रात्री ८ वाजता त्रिमूर्तीनगरातील यागेश्वरी भजन मंडळाचे भजन झाले. २४ फेब्रुवारीला जयताळा येथील श्रीसाई महिला भजन मंडळाचे भजन झाले. २५ फेब्रुवारीला प्रगट दिनानिमित्त श्रीचा अभिषेक व लघुरुद्र इंदुताई तलमले यांचे परिवारातर्फे झाले. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत धापेवाडा येथील उमेश बारापात्रे महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन झाले. दुपारी ४ वाजता पालखीसह शोभायात्रा काढली.श्री संत योगी गजानन महाराज मंदिर झेंडा चौक, महालयेथे २४ फेब्रुवारीपासून प्रकटदिन उत्सवाला सुरुवात झाली. रविवारी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. प्रकटदिनाच्या दिवशी सकाळी ९ वाजता महाराजांच्या प्रतिमेची दिंडीसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी पार पडले. हभप आदित्य देशकर यांचे कीर्तन झाले. सायंकाळी आरती व प्रसादाचे वितरण झाले. मंगळवारी सायंकाळी राजेश चिटणीस यांच्या नकलांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी दुपारी ४ वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी भक्तिगीत व सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.श्री गजानन महाराज देवस्थान, झेंडा चौक, धरमपेठश्री गजानन महाराज देवस्थानाची स्थापना १९५४ रोजी करण्यात आली. देवस्थानाचे हे ६४ वे वर्ष आहे. येथे प्रगटदिन, रामनवमी, ऋषिपंचमी साजरी करण्यात येते. प्रगटदिनानिमित्त सकाळी ७ ला सत्यनारायण, महाराजांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ १५ हजार भाविकांनी घेतला. यशस्वितेसाठी रोहिणी कापरे, ज्योती कापरे, राहुल कापरे, अरुण चोरघडे, अतुल चोरघडे, रामु तिवारी, हरीश रहांगडाले, कल्पना पाठक, मंगला भालेराव, वर्षा दुरुगकर, यमुताई गेडाम, रुमा कापरे, अनंता कापरे, वर्षा सायंकार, शालिनी बनसोड, आशा अग्रवाल, शोभा भिमगडे, कमल पांढरे, घनशाम महल्ले यांनी सहकार्य केले.श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबागरेशीमबाग येथील संत गजानन महाराज श्रद्धास्थानात सकाळी ८ वाजता पालखी काढण्यात आली. पालखीत १२ हजार भाविक सहभागी झाले. डॉ. विलास डांगरे, नगरसेविका दिव्या धुरडे, शीतल कामडी, डॉ. खुशाल गिरी, डॉ. आदित्य देव, डॉ. मुकुंद पांडे, मनीष तितरमारे, गिरीश वराडपांडे यांच्या हस्ते पालखीला सुरुवात झाली. पालखीत भजन मंडळे, सात घोडे, बँड पथक, लेझिम पथक सहभागी झाले. रेशीमबागला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात पोहोचली. मंगल अभिषेक, आरती करण्यात आली. महाप्रसादाचा लाभ सहा हजार भाविकांनी घेतला. सायंकाळी ६ वाजता शहनाई वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यशस्वितेसाठी रघुनाथ बोबडे, निरंजन बोबडे, डॉ. श्रीरंग वराडपांडे, प्रकाश निमजे, बाळासाहेब भेंडे, सुभाष मानकर, संजय रक्षिये, प्रफुल्ल पुरोहित, जयश्री चन्ने, सीमा पेंडके, मृणाली बरडे, लता तेलंग, प्रतिभा निफाडकर, रेखा भेंडे, दिलीप चन्ने, स्वरश्री वराडपांडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजReligious programmeधार्मिक कार्यक्रम