शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटीवाल्यांचे ‘टार्गेट’ तरुणाई : नागपुरात सर्रास लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:25 IST

रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.

ठळक मुद्देशारीरीक दोष सांगून अडकवताहेत जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या तरुणांना थांबवून त्यांच्यात शारीरिक दोष असल्याचे सांगून नसलेला आजार गळी पाडतात, जडीबुटीची भुकटी दाखवित ‘ये है इसका इलाज’ असे सांगून ५० ते १०० रुपये आकारतात. १०० टक्के रोग दूर होण्याची हमी देतात. दिवसाकाठी रोज शेकडो तरुण अशा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जडीबुटीवाल्यांच्या जाळ्यात अडकत असून, पैशासोबतच आपला जीवही टांगणीला लावत आहेत.अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतींमध्ये दररोज नवनवे संशोधन पुढे येत आहे. नव्या संशोधनाद्वारे वेगवेगळ्या आजारांवरील औषधांचा शोध लागत आहेत. असे असतानाही रस्त्यावरील जडीबुटीवाल्यांचा धंदा जोमात सुरू आहे. शहरात असे दोनशेच्यावर जडीबुटीवाले आहेत. यातील बहुसंख्य निरक्षर आहेत. पारंपरिक व्यवसाय म्हणून त्यांनी हा व्यवसाय आत्मसात केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु यातील अनेकांकडे जडीबुटीचे विशेष ज्ञान नसल्याचे सहज लक्षात येते.रस्त्याच्या कडेला बसून जडीबुटी व्यवसाय करणारे अनेक जण ‘सेक्स’च्या नावाने आपली औषधी खपवितात. स्वप्नदोष, शीघ्रपतन आदी दोष सांगून यावर शिलाजीत, मदनमस्त, कामराज मोदक, अमर फळ, बरफ फळ, इश्क अम्बर, काली मुसली, सफेद मुसली आदी जडीबुटीच्या नावाने विकतात. विशेष म्हणजे ‘मदनमस्त’ आणि ‘कामराज मोदक’ याच्या १० ग्रामची किमत ३०० रुपये तर अमर फळ, बरफ फळ याची किमत ६०० रुपये तोळा आहे. ग्राहकाशी भावठाव करीत ५० ते १०० रुपयापर्यंत हे जडीबुटी विकतात. यामुळे ग्राहकाच्या हातात पडणाऱ्या जडीबुटीत नेमके काय असते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. धक्कादायक म्हणजे, पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांच्या डोळ्यादेखत हा व्यवसाय सुरू आहे. मात्र कुणी कधीच कारवाई करताना किंवा त्यांच्याकडील औषधी तपासताना दिसून येत नाही.‘कोणत्याही रोगावर हमखास इलाज’चर्मरोगापासून ते मधुमेहापर्यंतच्या आणि कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीवर रामबाण इलाज असल्याचा दावा हे जडीबुटीवाले करतात. परंतु ही औषधे खरेच उपयुक्त आहेत का याचे उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ ठामपणे देत नाही. जडीबुटीवाल्यांची ही जमात वंशपरंपरेने राजवैद्य असल्याचा दावा करते.

 

टॅग्स :medicinesऔषधंfraudधोकेबाजी