शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:30 IST

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांची प्रतीक्षा संपली : ब्रह्मपुरीचा एनटी-१ मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे.

बुधवारी दुपारी खास पिंजऱ्यातून एनटी-१ या वाघाला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामधून येथे आणण्यात आले. चार जणांचे बळी घेणाºया या नर वाघाला ब्रह्मपुरी येथून १९ जुलैला जेरबंद करून आणले होते. देखभाल आणि उपचारासाठी त्याला गोरेवाडामध्ये ठेवण्यात आले होते. मागील तीन वर्षांपासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाकडून एका नर वाघाची मागणी सातत्याने केली जात होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहार सुरू होता. ही गरज लक्षात घेऊन केद्रींय चिडीयाघर प्राधिकरणानेही या वाघिणीला जोडीदार आणण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. त्यामुळे मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पत्रद्वारे मंगळवारीच या संदर्भात आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी बुधवारी तातडीने करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत या वाघाला येथे ठेवले जाणार आहे.नागरिकांना पाहण्यासाठी नाहीपुढील काळात एनटी-१ ला निसर्गमुक्त करावे किंवा कायम पिंजऱ्यात ठेवावे याबद्दल समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना पाहता यावे यासाठी सध्यातरी अनुमती नाही. या संदर्भात सीझेडचे आदेश आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे.ही मागणी पूर्ण होण्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे मोठे योगदान आहे. नागपूरकरांचीही या मागणीला साथ होती. त्याला आता यश आले आहे. पुढील निर्णयानंतर वाघाची जोडी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली जाईल.- सुनील बावसकर, प्रभारी व्यवस्थापक, महाराज बाग प्राणिसंग्रहालय

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ