शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अपघात रोखण्यासाठी ‘आयडीटीआर’; नागपुरात उभारले जाणार १७.९० कोटींचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:15 IST

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देचालकांना मिळेल ‘परफेक्ट ट्रेनिंग’ 

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ता अपघातात दर सहा मिनिटाला एक व्यक्ती दगावते तर दर मिनिटाला एक व्यक्ती जखमी होते. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. विशेष म्हणजे, एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे. १७ कोटी ९० लाख रुपये खर्चून ही संस्था कोराडी मार्गावरील गोधनी येथे उभारली जाणार आहे. या संस्थेमधून वाहनचालकांना अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाईल. भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. रस्ता अपघात टाळण्यासारखे असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. वेळ, वेग व वाहतुकीचे नियम यामधील संतुलन बिघडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली ‘फॅशन’ झाली आहे, परंतु हीच ‘फॅशन’ जीवावर बेतणारी ठरत आहे. अपघातात एखादा तरुण मृत्युमुखी पडला, तर केवळ एक व्यक्ती जीव गमावत नाही, तर त्याचे सारे कुटुंब मृत्युमुखी पडते. त्याची वैयक्तिक चूक पुढील सारा अनर्थ घडविते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आयडीटीआर’ महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे कार्य या संस्थेतून चालणार आहे. आरटीओ नागपूरकडून गेल्या दोन वर्षांपासून या संस्थेच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्राने नुकतीच याला मंजुरी देऊन १७ कोटी ९० लाख ५ हजार ८४२ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

२० टक्के अपघात कमी होण्याची शक्यतानागपूरच्या ‘आयडीटीआर’ या संस्थेत शासकीय वाहनचालकांसोबतच खासगी वाहन चालकांनादेखील प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याची सोय राहणार आहे. विदर्भातील आगारातील वाहनचालकांना या ठिकाणी पाचारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे २० टक्के अपघात कमी होण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘आयडीटीआर’‘आयडीटीआर’ ही अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने चालकांच्या वेगवेगळ्या चाचण्यात घेऊन त्यांना वाहन चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या ठिकाणी वाहनचालकांच्या डोळ्यांच्या तपासणीपासून ते वाहनावर नियंत्रण मिळवणे, ‘रिअ‍ॅक्शन टेस्ट’ उपलब्ध करून दिले जाते. साधारण ५० चालकांचा एक गट तयार करून हे प्रशिक्षण दिले जाते.

वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स मिळाल्यानंतरही अपघात होतात, कारण वाहनचालकांना आपल्या चुका कळत नाही, किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘आयडीटीआर’मधून वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी, संभावित अपघात टळतील, अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा