शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इतिहाद एअरवेज सेवेसाठी तयार

By admin | Updated: September 11, 2015 03:39 IST

इतिहाद एअरवेजने गुरुवारी दुपारी मिहान प्रकल्पाला भेट देऊन निवडक प्रकल्पाची पाहणी केली.

नागपूर : इतिहाद एअरवेजने गुरुवारी दुपारी मिहान प्रकल्पाला भेट देऊन निवडक प्रकल्पाची पाहणी केली. कंपनी नागपुरातून कार्गो आणि प्रवासी विमान सेवा सुरू करण्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सल्लागार (तांत्रिक) एस.व्ही. चहांदे यांनी मिहान प्रकल्पाचा आराखडा आणि अतुल ठाकरे यांनी पॉवर प्रेझेन्टेशनद्वारे प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. मिहान प्रकल्पाची माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. इतिहाद एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पावर चर्चा केली. चमूने मिहान प्रकल्पात गुंतवणुकीची तयारी दर्शविली. इतिहाद एअरवेजच्या चमूमध्ये इंडियाचे उपाध्यक्ष नीरज भाटिया, कार्गो विभागाचे उपाध्यक्ष डेव्हिड करीर, नेटवर्क प्लॅनिंग विभागाचे उपाध्यक्ष अ‍ॅलेक्स फेदरस्टोन, एअरपोर्टचे महाव्यवस्थापक मॅथ्यू डेव्हिस, इंटरनॅशनल व पब्लिक अफेअरचे वरिष्ठ व्यवस्थापक मोक्ष वॅट्स यांचा समावेश होता. इतिहाद एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून मिहान प्रकल्पाला भेट दिली. यापूर्वी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. इतिहाद एअरवेजचा ग्लोबल कार्गो आणि प्रवासी नेटवर्कसाठी भारत हा महत्त्वाचा भाग आहे. प्रारंभी मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक अबधेश कुमार आणि महाव्यवस्थापक आबीद रूही यांनी मिहानच्या मध्यवर्ती सुविधा इमारतीत इतिहास एअरवेजच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, आणि जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)