शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बीएडच्या जागी ‘आयटीईपी’; शिक्षकांसाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:19 IST

शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देएनसीटीईच्या प्रस्तावाची विद्यापीठाला प्रतीक्षा

आशीष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात इंट्रीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा राहणार आहे. परंतु अद्यापही हे स्पष्ट नाही की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ह्या अभ्यासक्रमाला कधीपासून लागू करेल.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात एनसीटीईने अद्यापपर्यंत विद्यापीठाला यासंदर्भात कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या अभ्यासक्रमाची माहिती नाही. सूत्रांच्या मते जर एनसीटीईकडून प्रारूप आले तरी अभ्यासक्रम चालू करण्यासाठी विद्यापीठाला बराच वेळ लागणार आहे. कारण विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागतील.त्याचबरोबर एनसीटीईच्या दिशानिर्देश आल्यानंतर विद्यापीठाला विद्वत परिषदेत पारित करावे लागले. त्यानंतर निर्देशानुसार अध्ययन मंडळाच्या बैठकीत अभ्यासक्रम तयार करावे लागेल.यासोबतच विद्यापीठाला एनसीटीईकडून अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी घ्यावी लागेल. सूत्रांच्या मते मंजुरीसाठी विद्यापीठाला २ ते २३ डिसेंबरदरम्यान अर्ज करावा लागेल. विद्यापीठासोबत संबंधित महाविद्यालयांना याच कालावधीत अर्ज करावा लागेल. यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, एनसीटीईकडून कुठलेही दिशानिर्देश आलेले नाही. त्यांना काही महाविद्यालयाकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. दिशानिर्देश आल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

असा असेल अभ्यासक्रमएनसीटीईचा आयटीपीई अभ्यासक्रम चार वर्षाचा असेल. प्रवेशासाठी पात्रता बारावी निर्धारित करण्यात आली आहे. बारावीत ५० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना बीएबीएडची डिग्री मिळेल. सध्या बीएड अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. त्यापूर्वी बीएड एक वर्षाचे होते. एनसीटीईच्या मते शिक्षकांमध्ये गुणवत्ता विकसित करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ