शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यांच्यावर ‘काका मला वाचवा’ म्हणण्याची वेळ आली; श्रीकांत शिंदे यांनी सोडले अजित पवारांवर बाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2023 20:39 IST

Nagpur News आता ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार, अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले.

नागपूर : स्वत:ची ओळख ज्यांनी काकांच्या नावाने प्रस्थापीत केली त्यांनी शिंदेंना कोण ओळखतं, असे बोलू नये. पाच सहा दिवसांपूर्वी त्यांना वाटले की आता मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. तसेच वागत होते. पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली. आता ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ यांच्यावर आली आहे आणि हे आम्हाला शिकवणार, अशी बोचरी टीका करीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बाण सोडले.

शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी नागपुरात पार पडला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे, खा. कृपाल तुमाने, आ. आशीष जयस्वाल, आ. नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव, पक्षाचे सचिव भाऊ चौधरी, संदीप इटकेलवार, मंगेश काशिकर आदी उपस्थित होते.

यावेळी खा. शिंदे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. शिंदे म्हणाले, बॅनर लावल्याने कुणी भावी मुख्यमंत्री होत नाही. यांनी पहाटेचा प्रयत्न केला पण जमले नाही. यांना ते जमले नाही ते मुख्यमंत्री शिंदे यांनी करून दाखवलं. याचं शल्य त्यांना आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न केला पण पुन्हा काकांनी हवा काढून घेतली. आज तुम्ही दुसऱ्या राज्यात जावून पहा, तुम्हाला किती लोक ओळखतात, असा सवाल करीत ‘सारा शहर अब मुझे काका के नाम से जानता है’ असा डायलॉग मारत त्यांनी अजित पवारांना डिवचले.

अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात !- गेली अडीच वर्षे वर्षा बंगल्याची दारे बंद होती. राज्यातील मुखियाला भेटण्यासाठी सर्वसामान्यांना कवायद करावी लागायची. आज वर्षाची दारे २४ तास खुली आहेत. यांनी तर अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विश्वविक्रम केला आहे, अशा शब्दात खा. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला. कोरोनाच्या काळात हे स्वत: घरी बसत होते व लॉकडऊना लावून जनतेलाही घरी बसवत होते. फेसबूक लाईव्हमध्ये मात्र यांनी पहिला नंबर मारला, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडीतील लोक वज्रमुठ दाखविण्यासाठी सभा घेत आहेत. मात्र हे सत्तेच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आता सत्ता नसल्याने एकमेकांना चावायला लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

विदर्भावर लक्ष देणार- यापूर्वी शिवसेनेकडून विदर्भावर लक्ष दिले जात नव्हते. जेथे आमचा फायदा नाही तेथे लक्ष देणार नाही, असे धोरण होते. पण आम्ही विदर्भातील प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवू. अडचणित साथ देऊ. संघटन बांधणी व विस्तार करू, असेही खा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे