नागपुरात गुरुवारी दिवसभर थंडी जाणवत होती. सायंकाळनंरतर थंडीची तीव्रता अधिकच जाणवली. तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साहात घराबाहेर पडलेले दिसले. नागपुरातील गुरुवारचे तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात गोंदियातील वातावरण सर्वाधिक थंड होते. १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तिथे झाली. चंद्रपूरचे तापमान १४.२, तर गडचिरोलीचे १३.४ नोंदविले गेले. या दोन्ही ठिकाणी गेल्या २४ तासांत एक अंशाने घट झाली आहे.
अकोला आणि बुलढाणा येथे १५.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावतीमध्ये १५.५ अंशांची नोंद झाली. वर्धा शहरात १४.२ अंशांची नोंद झाली असून, गेल्या २४ तासांत पारा ०.२ अंशाने उतरला आहे. येत्या आठवडाभरात असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.