शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे परपुरुषाच्या घरी राहणे हा मानसिक आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 05:18 IST

हायकोर्ट : घटस्फोटाचा निर्णय कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा समजावल्यानंतरही पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार जाऊन तेथे मुक्काम करीत असेल, तर तिची ही कृती पतीसाठी मोठा मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले आणि संबंधित पतीला कुटुंब न्यायालयातून मिळालेला घटस्फोट कायम ठेवला.

नागपूर येथील सुरेखा व नामदेव (बदललेली नावे) यांचे २४ मे १९८४ रोजी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या संसाराचे गणित सुरेखाची आई नागपुरात आल्यानंतर बिघडले. तिच्या आईने एका पोलीस अधिकाऱ्याकडे घरकामाची नोकरी मिळवली होती व ती त्याच्याच घरी राहत होती. सुरेखा आईला भेटण्यासाठी जात होती. सुरुवातीला त्यावर नामदेवचा काहीच आक्षेप नव्हता; परंतु काही दिवसांनी सुरेखाचे त्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाणे व त्याच्या घरी रात्रभर मुक्काम करणे वाढत गेले. त्यामुळे नामदेवने तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने ऐकले नाही. ती लपवाछपवी करून पोलीस अधिकाऱ्याच्या घरी मुक्काम करीत होती.

नामदेवने विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत होती. नामदेवने जाब विचारणे वाढवल्यानंतर सुरेखाने त्याच्याविरुद्ध ११ मे २००७ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तेव्हापासून दोघेही वेगळे राहायला लागले. नामदेवने मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने ती याचिका मंजूर केल्यामुळे सुरेखाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.  न्यायालयाने पुरावे लक्षात घेता सदर निरीक्षण नोंदवून तिचे अपील फेटाळून  लावले.

मुलींनी घेतली वडिलाची बाजूनामदेवची बाजू दोन्ही मुलींनी उचलून धरली. नामदेवने सुरेखावर केलेले आरोप खरे असल्याचे बयाण मुलींनी दिले. त्यामुळे नामदेवच्या याचिकेला बळ मिळाले. सुरेखाची कृती क्रूरतापूर्ण आहे. तिचे संबंधित वागणे सामान्य स्वरूपाच्या वागण्यामध्ये मोडत नाही, असेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

टॅग्स :Divorceघटस्फोट