शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आयटी पथक नागपुरात दाखल

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

विधिमंडळातील संगणक व्यवस्थेचे काम सांभाळणारी आयटी चमू नागपुरात दाखल झाली असून, सचिवालयाचे इतर कर्मचारी शुक्रवारपासून येणार आहेत.८ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी

विधिमंडळ अधिवेशन: कर्मचाऱ्यांच्या गाळ्यांची रंगरगोटीनागपूर : विधिमंडळातील संगणक व्यवस्थेचे काम सांभाळणारी आयटी चमू नागपुरात दाखल झाली असून, सचिवालयाचे इतर कर्मचारी शुक्रवारपासून येणार आहेत.८ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत. सचिवालयाचे कामकाज २८ तारखेपासून सुरू होणार असल्याचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सोमवारी जाहीर केले आहे. सचिवालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी तेथील संगणक व्यवस्था संचालित होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवारी २० जणांचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले. ते बुधवारपासून त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहेत.निवास व्यवस्थेचे काम सुरूदरम्यान, मुंबईहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था सिव्हील लाईन्समधील १६० खोल्यांच्या गाळ्यात केली जाते. तेथील खोल्यांची डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. १६० खोल्यांचे गाळे असे या खोल्यांचे नामकरण झाले असले तरी प्रत्यक्षात त्या १९६ खोल्या आहेत. प्रत्येकी तीन खोल्यांचे एक घरच कर्मचाऱ्यांना विधिमंडळ अधिवेशन काळात राहण्यासांठी दिले जाते. एकूण २१ बरॅकमध्ये या खोल्या विभाजित करण्यात आल्या असून, त्यापैकी तीन बरॅक नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे एकूण १६४ खोल्या वापरात आहेत. याशिवाय नव्याने बांधलेल्या इमारतीत ६४ खोल्या आहेत. या सर्व खोल्यांमध्ये सचिवालयाचे कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था दरवर्षी केली जाते. सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या संघटना तसेच मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून या खोल्यांची देखभाल-दुरुस्ती केली जात असून या कामाला सुरुवात झाली आहे. या सर्व खोल्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भोजनगृहाची व्यवस्थाही येथे आहे. (प्रतिनिधी)