शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या मुद्यावर संयम ठेवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:31 IST

अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्री श्री रविशंकर यांनी सरसंघचालकांची घेतली भेटभेटीबाबत मौन

आॅनलाईन लोकमतनागपूर : अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे. रविशंकर यांच्या प्रयत्नांवर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली . संघाच्या घोषपथकाच्या 'स्वरमोहिनी' कार्यक्रमाला देखील ते उपस्थित होते. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले होते. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही भेट झाली . मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले नाही.श्री श्री रविशंकर यांचा यू टर्नअयोध्या व लखनौ येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली होती . त्यानंतर नागपुरात आल्यानंतर ते उत्साही वाटत होते व सकारात्मक असल्याचे त्यांनी प्रतिपादन देखील त्यांनी केले होते . मात्र शनिवारी त्यांनी ठोस वक्तव्य करण्याचे टाळले . नागपुरात आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणार असे त्यांनी उघडपणे सांगितले . ही बाब संघाला रुचली नसून याबाबत संघातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . रविशंकर यांनी देखील यू टर्न घेत आपण फक्त कार्यक्रमासाठी आलो असल्याचे सांगितले .घोष पथकाच्या तालाने निनादले आसमंतराष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घोष पथकाचे मोठे महत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे पथक मानण्यात येणाऱ्या घोष पथकाचा नागपुरात भव्य कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाला सरसंघचालक , श्री श्री रविशंकर, गायिका अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर,उदित नारायण, पंडित मनिप्रसाद , उल्हास कशाळकर, सुरेश तळवलकर प्रामुख्याने उपस्थित होते .देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे कुठे पथसंचलन होते, त्यावेळी घोष पथकाचा त्यात आवर्जून समावेश असतो. प्रत्येक शाखेचे घोष पथक असते. दलप्रमुख, घोषप्रमुख यांचा समावेश असलेल्या घोष पथकाद्वारे स्वर, नादांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागविणाऱ्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले . विशेष म्हणजे या सादरीकरणासाठी काही रचना खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील रचल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Politicsराजकारण