शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

ते १५ लाख हायकोर्टात जमा

By admin | Updated: October 21, 2015 03:35 IST

राज्य शासनाने सीताबर्डी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून चोरी झालेले १५ लाख ५ हजार रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा केले आहेत.

याचिकाकर्त्याला दिलासा : सक्षम हमी सादर करण्याचे निर्देशनागपूर : राज्य शासनाने सीताबर्डी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून चोरी झालेले १५ लाख ५ हजार रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा केले आहेत. संबंधित याचिकाकर्त्याला ही रक्कम काढून घेण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सचिन खरे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. २७ मार्च २०१२ रोजी पोलिसांनी याचिकाकर्त्याच्या घरी धाड टाकून शयनकक्षातून १५ लाख ५ हजार रुपये जप्त केले होते. ही रक्कम २८ मार्च रोजी सदर पोलीस ठाण्यातील मालखान्यात ठेवण्यात आली होती. यानंतर १ जून २०१२ रोजी रक्कम सीताबर्डी पोलीस ठाण्यातील मालखान्यात स्थानांतरित करण्यात आली. तेथून ही रक्कम कॉन्स्टेबल अनिल बोबडे यांनी चोरली. ही रक्कम सुपुर्दनाम्यावर मिळण्यासाठी खरे यांनी सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे खरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, शासनाने खरे यांची रक्कम बोबडे यांनी चोरल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. यामुळे उच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१४ रोजी खरे यांचा अर्ज मंजूर करून चोरीची रक्कम वसुल करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर शासनाने बोबडे यांना निलंबित केले व त्यांना मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यातून दर महिन्याला १० हजार रुपये वसुल करायला सुरुवात केली. खरे यांनी या कारवाईवर असमाधान व्यक्त करून दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली व संबंधित रक्कम एकाचवेळी न्यायालयात जमा करण्याचे शासनाला निर्देश देण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक निर्देशानंतर शासनाने संबंधित रक्कम न्यायालयात जमा केली आहे. ही रक्कम काढून घेण्यासाठी सक्षम हमीदार सादर करावा असे खरे यांना सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)असे आहे मूळ प्रकरण२७ मार्च २०१२ रोजी सीताबर्डी पोलिसांनी स्टेट बँक आॅफ इंडिया एम्प्लॉईज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तक्रारीवरून सचिन खरे व इतर आठ आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपींवर फसवणुकीचा आरोप आहे. १० मार्च २०१० रोजी आरोपींनी संस्थेतील १ कोटी ८७ लाख रुपयांत पेवठा येथे जमीन खरेदी केली. यानंतर ही जमीन संस्थेलाच सहा कोटी रुपयांत विकली अशी तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेऊन याचिकाकर्त्याच्या घरी धाड टाकण्यात आली होती.