शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:12 IST

अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देआंबेडकरी महिला संमेलनातील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.दिल्लीचे प्रा. संजीव चंदन यांनी या स्त्री मुक्तीच्या चळवळीचे विश्लेषण केले. महात्मा फुले यांच्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांसाठी ठोस भूमिका घेतली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. त्याकाळी महिलांच्या मातृत्वाच्या रजेचा मुद्दा उपस्थित करणारे ते एकमेव व्यक्ती होते. महिलांच्या अधिकाराचा अजेंडा त्यांनी ठेवला, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनांना धोरण राबविण्याची सूचना त्यांनी दिली. महिलांबद्दल समानतेचा दृष्टिकोन ठेवायला समाज तयार नाही, अशावेळी शासनाने कठोरपणे त्यांच्या अधिकारासाठी पावले उचलावी, अशी तरतूद त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केली आहे. या मूल्यामुळे महिलांमध्ये एक जाणीव निर्माण झाली. मात्र संघर्षाचे दोन गट पडले. स्त्री मुक्तीच्या आंदोलनात जातीभेदाचा मुद्दा नसलेला एक गट आणि हा मुद्दा घेऊनच संघर्ष उभा करणारा दलित महिलांचा दुसरा गट. मात्र जातीभेदाचा मुद्दा नसला तरी बोलण्याचा, लग्नाचा व निर्णयाचा अधिकार पहिल्या गटातही असल्याने त्यांचे आंदोलनही ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच होते. त्यामुळे महिलांचा प्रत्येक संघर्ष हा कोणत्याही अर्थाने पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच ठरलेला आहे. आज राजकीय व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण आणि खासगी क्षेत्रातही आरक्षणाचा मुद्दा पुढे करून आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी कल्याणी ठाकूर यांनी बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेत पाठविण्यात आल्याचा उल्लेख केला. ही बाब बंगाल आणि महाराष्ट्राला एका धाग्यात जोडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कम्युनिस्टांच्या अजेंड्यात जातीभेद निर्मूलनाचा समावेश नव्हता. स्त्री-मुक्तीचे आंदोलन वर्गवारीवर आधारीतच होते व फेमिनिझममुळे उच्चवर्णीय महिलांपुरते मर्यादित होते. त्यात दलित महिलांचा समावेश नव्हता. बंगालमध्ये दलित उत्थानासाठी गुरुचंद ठाकूर व त्यांचा मुलगा होरीचंद ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख कल्याणी यांनी केला. महाराष्ट्राकडून प्रेरणा घेउन दलितांच्या प्रश्नावर बंगालमध्ये आंदोलन उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. संचालन वंदना जीवने यांनी व आभार विशाखा लांजेवार यांनी मानले. 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरWomenमहिला