शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी व विरोधक एकत्र

By admin | Updated: June 21, 2017 02:35 IST

शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमणाला आळा घालण्याची गरज आहे.

 सभागृहात एकमत : प्रभाग स्तरावर उपद्रव शोधपथक ; १५१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमणाला आळा घालण्याची गरज आहे. यासाठी आता प्रभाग स्ततरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला. स्वच्छतेच्या मुद्यावर महापालिकेतील सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी सर्वसाधारण सभेत बघायला मिळाले. झोन स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. परंतु गतकाळातील नागरी पोलिसांचा अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे नागरी पोलिसांची संकल्पना नागपुरात नापास ठरली होती. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावात बदल करून प्रभाग स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मांडला. सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी याला पाठिंबा दर्शविला. त्यानुसार उपद्रव शोधपथक ासाठी १५१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदा जिचकार यांनी मंजुरी दिली. उपद्रव शोधपथक गठित करण्याला आमचा पाठिंबा आहे. यासाठी निधीची गरज भासल्यास नगरसेवकांच्या वॉर्ड फंडातील निधी घ्यावा, अशी भूमिका काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी मांडली. संदीप सहारे, बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांच्यासह विरोधी सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनीही शहर स्वच्छतेच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका घेतली. सभागृहात गेल्या काही वर्षात प्रथमच सत्ताधारी व विरोधक एखाद्या मुद्यावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करताना दिसले. महापालिका प्रशसनाने झोन स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव दिला होता. यात सुधारणा करून प्रभाग स्तरावर पथके गठित केली जाणार आहे. यात माजी सैनिकांचा समावेश राहणार आहे. भरती प्रक्रि या राबविण्याला मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती ठरविणार वेतन उपद्रव शोधपथकातील अधिकारी व सुरक्षा रक्षकांचे वेतन निश्चित करण्याचा निर्णय स्थायी समितीने घ्यावा. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवावा, अशी भूमिका अविनाश ठाकरे व बाल्या बोरकर यांनी मांडली. त्यानुसार संदीप जोशी यांनी सूचना केली. वेतन निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविण्याचे निर्देश महापौरांनी दिले.