शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ४० पशुरुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:06 IST

देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.

ठळक मुद्देलोकसहभागातून डिजिटलायझेशनकडे वाटचाल : पशुपैदास व दुग्धउत्पादनात होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.शेतकऱ्यांना दुग्ध व चारा उत्पादनाची जोड मिळाल्यास ते समृद्धतेची कास धरू शकतात हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा स्थानिक पशु रुग्णालयांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळेल. आपली भूमिका ही मार्गदर्शकाची असावी, हा हेतू पशु रुग्णालयांचा आहे. पुढील काळात ही रुग्णालये शेतकऱ्यांच्या प्रगतीचा तारणहार ठरण्याची शक्यता आहे़ नागपूर जिल्ह्यात वर्षभरात आयएसओ मानांकन मिळविलेली ४० रुग्णालये ही लोकसहभागातून झाली आहे. शासनाचा एक पैसाही या प्रक्रियेवर खर्च झाला नाही़ त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे़शासन अधिकृत अखिल भारतीय स्तरावरील एका कंपनीने हा आएसओचा मान ४० रुग्णालयांना दिला आहे़ यामध्ये सर्व दस्तऐवज अद्ययावत झाले आहे, परिसर स्वच्छता, विविध योजनांची माहिती, शेतकऱ्यांना वर्गीकृत सुविधा, कृत्रिम रेतन, उत्तम पशुपैदास, हिरव्या चाºयांचे बारामाही उत्पादनावर मार्गदर्शन व प्रोत्साहन, गांडुळखत व जलपुनर्भरण प्रकल्प, अशा स्वरूपाचे दोन डझन उद्धिष्टे या रुग्णालयांनी साध्य केली आहे़- या पशु रुग्णालयांचा समावेशनांदागोमुख, पाटणसावंगी, मोहपा, कोहळी, हिंगणा, गुमगाव, वडोदा, कोराडी, गुमथळा, टेमसना,लाडगाव, झिल्पा, मेटपांजरा, कोंढाळी, मांढळ, कुही, साळवा, अरोली, मौदा, चाचेर, कोदामेंढी, आजनगाव, नरखेड, जलालखेडा, सावरगाव, पिपहा, मेंएळला, कन्हान, पारशिवनी, करवाही, साटक, माहुली, बेला, मकरधोकडा, बोरगाव, चारगाव, भिवापूर तर राज्य शासन अखत्यारितील काटोल व सावनेर पशुरुग्णालयांचा समावेश आहे़- शेतकरी, शेती आणि त्यांच्याकडील गोपालन, यासाठी जिपच्या पशुरुग्णालयाशी शेतकऱ्यांचा वारंवार संबंध येतो़ त्यामुळे तितक्याच सक्षमपणे व वेळेत त्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते़ हे प्रयत्न कारणी लावल्यानेच या सर्व रुग्णालयांना हा मान मिळाला आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून ज्या सेवासुविधा पुरविल्या जातात, त्यात आणखी सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- डॉ. उमेश हिरुळकर जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, जि.प.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर