शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आहे महागडा तरी; जिकडे तिकडे एचडी मेकअपचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 19:29 IST

Nagpur News वर्तमानात एचडी मेकअपची चर्चा जोरात आहे आणि यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याचे दिसून येेते.

 

नागपूर : मेकअप हा काही नवीन विषय नाही. खासकरून महिला वर्गासाठी असलेली ही मेकअपची प्रक्रिया आता पुरुषवर्गानेही स्वीकारलेली आहे. वैवाहिक आणि इतर कौटुंबिक सोहळ्यांसोबतच अनेक सार्वजनिक उत्सवांसाठी मेकअप अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वर्तमानात तर हायप्रोफेशनमध्ये असलेल्या महिलांसाठी मेकअप हा रोजचाच विषय ठरलेला आहे. त्यामुळे आता घरोघरी ब्युटीपार्लर सुरू झाले आहे, असे म्हणणे वागवे ठरणार नाही. वर्तमानात एचडी मेकअपची चर्चा जोरात आहे आणि यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याचे दिसून येेते.

नवरात्रात ‘एचडी’ मेकअपची मागणी

- नवरात्रोत्सव पार पडले असले तरी उत्सवांची भलमार आहे. शारदोत्सव अजूनही सुरूच आहे. सोबत कोजागिरी, दिवाळी आदी सण आहेतच. महिलावर्गांमध्ये नवरात्रापासून मेकअपच्या तयारीला अधिक वेग येतो. गरबा, दांडिया खेळताना नटूनथटून जाताना मेकअप करणे अनिवार्यच ठरते आणि त्यामुळे या काळात मेकअपची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यात एचडी मेकअपकडे अनेकांचे प्राधान्य असल्याचे दिसून येते.

पाऊस वा घाम, ‘एचडी’ करेल काम

- एचडी मेकअपला सर्वसामान्य भाषेत सिंथेटिक मेकअप म्हटले जाते. सर्वसामान्य मेकअप घाम, पाऊस, आदींमुळे निघतो. मात्र, सिंथेटिक मेकअप घाम असो वा पाऊस, दीर्घकाळ जसाच्या तसा टिकून राहतो.

दोन हजारांपासून सुरुवात

- जेवढा चांगला मेकअप, तेवढाच खर्चही अधिक असतो. एचडी मेकअपसाठी दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेकदा त्याहीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

घागरा, ज्वेलरीवर पाच हजारांपर्यंत खर्च

- नवरात्रोत्सवात गरबा, दांडियांसाठी महिलांनी खासकरून गुजराती घागरा, ज्वेलरीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे दिसून आले. खास गरबा-दांडिया स्पेशल वस्त्र व अलंकार भाड्यानेही उपलब्ध होत होते.

कायम फ्रेश दिसण्यासाठी एचडी मेकअप

- प्रत्येक व्यक्ती स्वत:तच सुंदर असतात. मात्र, विशेष उत्सवासाठी नटणे ही परंपरा आहे. मेकअप हा त्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही उत्सवात सहभागी होताना दीर्घकाळ फ्रेशनेस दिसावे, असे प्रत्येकाला वाटते. एचडी किंवा सिंथेटिक मेकअप ही इच्छा पूर्ण करतात.

- ज्योती शर्मा, ब्युटिशियन

.............

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स