शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सिंचन ४० टक्क्यांवर नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:37 IST

सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : शोभा फडणवीस यांच्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच शेतकरी आत्महत्या कमी होतील. पुढील दोन वर्षांत राज्यातील सिंचन ४० टक्क्यांवर नेणार, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे रविवारी त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, खा. विकास महात्मे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. नागो गाणार, आ. समीर कुणावार, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, विश्वास पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात पंचवार्षिक योजना ज्या दिशेने गेली, त्यावर विचार करण्याची गरज आहे. समाजवाद, साम्यवाद आणि ‘पुंजीवाद’ या चक्रात कृषी धोरण आखताना गोंधळ झाला. सिंचनासाठी ज्यावेळी निधी देणे अपेक्षित होते तेव्हा एअर इंडियासाठी ७० हजार कोटींची विमाने विकत घेण्यात आली. मुळात आजच्या तारखेत सिंचनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. धरणे भरली असताना शेतकºयांना पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य धोरण आखून सिंचन क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. नदीजोड प्रकल्पात राज्यामध्ये प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे निश्चित सिंचन वाढेल, असे गडकरी म्हणाले. तांदूळ, गहू, कापसासारख्या पिकांमुळे शेती फायद्यात येऊ शकत नाही. या पिकांना वाढीव भाव देणेदेखील शक्य नाही. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग शेतकºयांनी सुरू केले तर त्यांचे उत्पन्न सहज वाढू शकते, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. शोभा फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या समस्या कधीच सुटणार नाहीत. शेतकºयांच्या मानसिकतेचा विचार करून धोरणे आखायला हवीत. विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्मिता माहूरकर यांनी संचालन केले....अन्यथा आपल्यावरील विश्वास संपेलशेतीच्या समस्यांवर आंदोलन करणे सोपे असते. मात्र त्यावर मार्ग काढणे जास्त आवश्यक आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलने केली. आता सगळीकडेच आमची सत्ता आहे. त्यामुळे मी जनप्रतिनिधींना म्हणतो की चर्चा करण्यापेक्षा उत्तरे शोधा. अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास संपेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.दिल्लीला पाण्याचे दु:ख कळलेच नाहीउत्तर भारतात सिंचनाची फारशी समस्या नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकांचे पाण्याचे दु:ख माहीत नाही. आपण आजपर्यंत आपले दु:ख व समस्या योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही व त्यांनादेखील पाण्याचे दु:ख कळले नाही. मात्र आता काहीही झाले तरी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.