शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सिंचन घोटाळा : नवीन तीन प्रकरणांत दोषारोपपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:53 IST

विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये कारवाई करणे सुरूच असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन तीन प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयांत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. तसेच, चार नवीन प्रकरणांत एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. पाच अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची अनुमती मागणारे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होते. त्यापैकी चार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराज्य सरकारची हायकोर्टात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये कारवाई करणे सुरूच असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन तीन प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयांत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल केली आहेत. तसेच, चार नवीन प्रकरणांत एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. पाच अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची अनुमती मागणारे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होते. त्यापैकी चार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.विशेष सरकारी वकील अ‍ॅड. आनंद जयस्वाल यांनी गुरुवारी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांच्या जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जगताप यांचे वकील अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पातील गैरव्यवहाराच्या चौकशीमध्ये काहीच प्रगती झाली नसल्याचा आरोप केला. अ‍ॅड. जयस्वाल यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना चौकशी शेवटच्या टप्प्यात असून, चौकशीचा अंतिम अहवाल लवकरच सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सिंचन घोटाळ्याचा तपास व कारवाईमध्ये झालेल्या नवीन प्रगतीवर दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. तसेच, नवीन तीन प्रकरणांत दाखल करण्यात आलेले खटले तीन महिन्यांत निकाली काढण्यात यावेत, असे संबंधित विशेष सत्र न्यायालयांना सांगितले. जनमंचतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.बाजोरियाकडील चार कंत्राटांवर आक्षेपजगताप यांनी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला वाटप झालेल्या चार कंत्राटांवर आक्षेप घेतला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कंत्राटाचा समावेश आहे. या प्रकरणात माजीउपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अजित पवार व माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प