शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

‘सिंचन’ चौकशीची तटकरेंना घाई

By admin | Updated: August 28, 2016 02:06 IST

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे.

चौकशी लवकर पूर्ण करण्याची मागणी : सरकारची फक्त टिष्ट्वटरवर टिवटिवनागपूर : आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे. या चौकशीत आपलेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. तटकरे यांनी चौकशीला गती देण्याची मागणी करून एकप्रकारे सरकारला आव्हानच दिल्याचे मानले जात आहे. तटकरे यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, प्रभारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी राज्यातील युती सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकार फक्त टिष्ट्वटरवर टिवटिव करते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रश्न समजून घेत नाही. सरकारने व्यापाऱ्यांना कोट्यवधींची एलबीटी माफी दिली. मात्र, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यालाही कर्जमाफी दिली नाही. धान, कापूस आदी पिकांना चांगला भाव दिला नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाहीनागपूर : सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजप- शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफुसीचा परिणाम शासकीय यंत्रणेवर होत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना ५० टक्के नोकरशाही आमचे ऐकत नाही, असे सांगावे लागत आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेण्याचा शिवसेनेकडून होणारा प्रयत्न ही जनतेची फसवणूक आहे. विरोधकांसह सामान्य नागरिकांची गळचेपी करणाऱ्या प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा कायद्याला चौफेर विरोध झाल्यामुळेच सरकारने मसुदा परत घेतला. पण असा कायदा आणण्याचा मानस सरकारने का केला, हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. विधान परिषदेत काँग्रेसतर्फे राणे आल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव कमी झालेला नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मी स्वत: व इतरही सहकारी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. आमचा प्रभाव कमी झाला नाही व होणारही नाही. मात्र, राणेंच्या माध्यमातून काँग्रेस आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, नाागपूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, अजय पाटील, रमेश फुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आघाडीचे अधिकार स्थानिक नेत्यांनाआगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसने तयारी दर्शविली तर सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी आहे. राष्ट्रवादी सर्वच निवडणुका ‘घड्याळा’वर लढेल. कुठेही स्थानिक पातळीवर शहर आघाडी किंवा विकास आघाडी अशा बॅनरखाली दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला जनता साथ देणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच सरकारने निवडणूक पद्धधीतच बदल केला आहे. गादी वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीत नगर परिषदेचा नगराध्यक्ष थेट निवडण्याचा तसेच महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली. विदर्भाबाबत जनभावना पक्षाला मान्यवेगळ्या विदर्भाबाबत विदर्भातील जनतेच्या ज्या भावना असतील त्या पक्षाला मान्य आहेत. पण तसे काही नसताना सरकारतर्फे वेगळी भूमिका मांडली जात आहे. गोव्यात वेगळ्या राज्यासाठी सार्वमत झाले होते. आता येथे कसा निर्णय घ्यायचा ते सरकारने ठरवावे. एकीकडे सरकारमध्ये एकत्र नांदायचे व बाहेर विदर्भाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करायची, असा भाजप- सेनेचा खेळ सुरू आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. विदर्भातील जे राष्ट्रवादीचे नेते आपली भूमिका मांडत आहेत, त्यांच्या मतांचा आमचा पक्ष आदर करतो, असेही त्यांनी सांगितले.