शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

१.२० लाख हेक्टरमधील सिंचन वांंध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पेंच नदीवर मध्य प्रदेशात चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, त्यात ...

नत्थू घरजाळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पेंच नदीवर मध्य प्रदेशात चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, त्यात पाणी अडविण्यात आल्याने याच नदीवरील ताेतलाडाेह व पेंच प्रकल्पातील जलासाठा कमी झाला आहे. त्यामुळे या दाेन्ही प्रकल्पावर अवलंबून असलेले नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतीचे सिंचन वांध्यात आले आहे. ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने मध्य प्रदेशातील कन्हान नदीवरील लाेहघाेगरी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दाेन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा आहे.

पेंच नदीवरील ताेतलाडाेह आणि पेंच प्रकल्प नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले हाेते. या दाेन्ही प्रकल्पातील पाण्यामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील खरीप व ५० हजार हेक्टरमधील रबी पिकांचे असे एकूण १ लाख २० हजार हेक्टरमधील विविध पिकांचे सिंचन व्हायचे. ताेतलाडाेह प्रकल्पातील पाणी पेंच प्रकल्पात साेडून पुढे ते कालव्याद्वारे ओलितासाठी दिले जाते.

ताेतलाडाेह प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १,०१६ दलघमी तर पेंच जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता १,३४६ दलघमी आहे. याच नदी मध्य प्रदेशातील चाैराई (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथे माचागाेरा चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, सन २०१६ पासून पाणी साठवायला सुरुवात झाली. परिणामी, पेंच नदीद्वारे मध्य प्रदेशातून येणार पाणी चाैराई धरणात अडविण्यात आल्याने ताेतलाडाेह व पेंच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे बंद झाले. याचा परिणाम या दाेन्ही प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेवर अर्थात त्यावर अवलंबून असलेल्या दाेन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला.

ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने लाेहघाेगरी प्रकल्पाला २०१८ साली मंजुरी दिली. हा प्रकल्प मध्य प्रदेशतील कन्हान नदीवर असून, त्यातील पाणी टनेलद्वारे ताेतलाडाेह प्रकल्पात साेडले जणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण बनला असून, ताे पूर्णत्वास कधी जाते याकडे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

...

४२१ दलघमी पाण्याची कमतरता

चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच प्रकल्पांमध्ये एकूण ४२१ दलघमी पाण्याची कमतरता जाणवायला सुरुवात झाली. लाेहघाेगरी (मध्य प्रदेश) येथून ६५ किमीचा टनेल तयार करून त्यातील पाणी ताेतलाडाेह जलाशयात साेडण्याची याेजनाही राज्य शासनाने आखली व त्याला मंजुरी दिली. लाेहघाेगरी जमघाट (मध्य प्रदेश)पासून आठ किमी अंतरावर आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने २,५०० काेटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पातून ३०० दलघमी पाणी मिळणार आहे. या पाण्यापासून १६० मेगावॅट विजेचे उत्पपादनही हाेणार आहे.

....

सन २०१८ च्या पुनरावृत्तीची शक्यता

चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने सन २०१८ मध्ये नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे धानाच्या पिकाचे माेठे नुकसान झाले हाेते. शिवाय, या दाेन्ही जिल्ह्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्याने धानाच्या राेवण्याही रखडल्या हाेत्या. त्यानंतर सन २०१९ व २०२० साली ताेतलाडाेह व पेंच प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले हाेते. लाेहघाेगरी प्रकल्पा लवकर पूर्णत्वास न गेल्यास सन २०१८ ची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.